शिरपूर तालुक्यात आदिवासी दिवस उत्साहात






शिरपूर - जामण्यापाडा ता. शिरपूर येथे विश्व आदिवासी दिवस लॉकडाउनचा पालन करीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आदिवासी क्रांतिकारकांना अभिवादन करून, आदिवासी पारंपरिक वेशभूषेत विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मा. सरपंच दिलीप पावरा यांनी स्वच्छतेचा संदेश दिला, विलास पावरा जिल्हा सल्लागार बिरसा क्रांती दल यांनी आदिवासी संस्कृती, शिक्षण, विश्व आदिवासी दिवसाचे महत्त्व पटवून देत जास्तीत जास्त तरूणांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले, मा. पोलिस पाटील भावसिंग पावरा यांनी गावात शांतता कशी राखली जाईल याबाबत सविस्तर समजावून सांगितले.  गेंद्या पावरा यांनी आदिवासी समाज मागे का याविषयावर प्रकाश टाकला. तसेच यावेळी गावातील उपस्थित मान्यवर रमेश पावरा, भाईदास पावरा, रामलाल पावरा, कैलास पावरा, उपसरपंच सुभाराम पावरा, राहंग्या पावरा, गमेश पावरा, मुजिराम पावरा, शिलदार पावरा, कुलसिंग पावरा तसेच गावातील इतर मान्यवर उपस्थित होते व नाच गाण्याचा आनंद लुटला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने