धुळे जिल्ह्यात युवा करणी सेना महाराष्ट्र प्रदेश युवाशक्ती अध्यक्ष मा.गिरीशसिंग परदेशी यांची तरूणांना भेट साक्री तालुक्यातील बळसाणे गावात करणी सेना चा पदग्रहण सह कार्यक्रम संपन्न




   प्रतिनिधी:-दिग्विजयसिंग राजपुत
     मो.9860679223
         करणी सेना चा दि.९ ऑगस्टला साक्री तालुक्यातील बळसाणे गावात कार्यक्रम संपन्न धुळे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारीनां नियुक्ती पत्र देऊन सत्कार समारंभ करण्यात आला. करणी सेना राष्ट्रीय अध्यक्ष सुरजपाल अम्मुजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकर ढोमसे, राष्ट्रीय मंत्री संजयसिंह नाईक, राष्ट्रीय महीला शक्ती अध्यक्ष किर्ती ताई राठोड, महाराष्ट्र महीला प्रदेश अध्यक्ष अॅड संध्याताई राजपुत,महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष देविचंद्रसिंह बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दि.९ ऑगस्टला साक्री तालुक्यातील बळसाणे गावात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील करणी सेना चे पदअधिकारी च्यां नियुक्त्या करण्यात आल्या तसेच पदअधिकारीना नियुक्ती पत्र देऊन सत्कार समारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय अध्यक्ष मा.मधूकर ढोमसे व महाराष्ट्र प्रदेश युवाशक्ती अध्यक्ष मा.गिरीशसिंह परदेशी हे होते तसेच मंचावर उपस्थित महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता दिनेशसिंग जाधव, महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष हर्षलसिंग राजपुत, उत्तर महाराष्ट्र युवा उपाध्यक्ष पै.आकाश परदेशी, खान्देश विभाग युवा अध्यक्ष उमेश गिरासे, उत्तर महाराष्ट्र युवा मुख्य सल्लागार, प्रदिपसिंग राजपुत, पै.अभिजित राजपुत विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष, धुळे जिल्हा अध्यक्ष शिवा पहेलवान, जयपाल गिरासे उत्तर महाराष्ट्र युवा प्रवक्ता, देवेंद्रसिंग राजपुत युवा मंत्री उत्तर महाराष्ट्र, पै.राजू राजपुत युवा महामंत्री उत्तर महाराष्ट्र रतनसिंग राजपुत नंदुरबार जिल्हा कार्यअध्यक्ष   शिंदखेडा तालुका महामंत्री महेशसिंग राजपुत आदि मान्यवर उपस्थित होते.
       कार्यक्रमात राष्ट्रीय उपाध्यक्ष मधूकर ढोमसे यांनी करणी सेना चे महत्त्व व त्यांचे मनोगत व्यक्त केले तसेच प्रदेश प्रवक्ते दिनेशसिंग जाधव यांनी तरूणांना योग्य असे मार्गदर्शन करत मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र प्रदेश युवा शक्ती अध्यक्ष गिरीशसिंग परदेशी यांनी देखील तरूणांना करणी सेना चे महत्त्व व कार्य पठवून दिले व धुळे जिल्हा व नंदुरबार जिल्हा मधील तरूणांना च्या समस्या विचारून घेतल्या. यावेळी धुळे जिल्हा सह नंदुरबार जिल्ह्यातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी गिरीशसिंग परदेशी व आलेल्या मान्यवरांचे तरूणांच्या वतीने खुप जोरदार जंगी स्वागत करण्यात आले. काही तरूणांच्या डोळ्यात अश्रू देखील आले कारण गिरीशसिंग परदेशी यांच्या काही दिवसांपूर्वी अपघात झाला असून त्यांच्या पायाला जबरदस्त लागले असून त्यांना चालता सुद्धा येत नव्हते तरी देखील तरूणांच्या शब्दाचा मान टेवून कार्यक्रमाला उपस्थित राहीले त्यावेळी तरूणांनी जोरदार घोषणा देऊन गिरीशसिंग परदेशी यांचे मनोबल वाढविले व तरूणांनी म्हटले की आपल्या समाजात दादानं सारख्या लोकांची खुप गरज आहे आपल्या समाजाला अशे नेतृत्व लाभले म्हणून आपले खुप मोठे भाग्य समजा समाजातील लोकांनी त्यांचा आदर्श घ्यायला हवा व आम्ही सर्व तरूण गिरीश दादांच्या मागे नेहमी उभे राहून अन्याय विरूद्ध लढून गोर गरीब बांधवांना न्याय मिळवून देत जाऊ असे म्हटले. यामुळे गिरीश परदेशी यांचे खुप मोठे मनोबल वाढले आहे.
       हा कार्यक्रम शिवराणा ग्रुप महाराष्ट्र प्रदेश चे संस्थापक अध्यक्ष रोहीतसिंग राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली साक्री तालुक्यातील करणी सेना चे सर्व पदअधिकारी यांनी केले होते.कार्यक्रम यशस्वी करीता धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील युवा करणी सेना चे पदअधिकारी व कार्यकर्ते यांनी खुप मेहनत घेतली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने