नगरसेवक हेमंत पाटील यांची शिंगावे कोविड केअर सेंटरला भेट ,रुग्णांच्या समस्या समजून घेत समस्या सोडवण्यासाठी तहसीलदारांची चर्चा

 

 शिरपूर प्रतिनिधी -  शिरपूर तालुक्यात कोरोना महामारी मुळे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यावर नियंत्रण मिळवणे, रुग्णांसाठी प्रथम उपचार आणि त्यांचे विलगीकरण यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न  करत आहे. तालुक्यातील रुग्णांसाठी शिंगावे कोविड सेंटर,  आणि उपजिल्हा रुग्णालय  येथे रुग्णांची आरोग्य सेवा आणि विलगीकरण कक्ष यांची सोय करण्यात आली आहे.
 आज भाजपाचे शहराध्यक्ष, नगर सेवक  हेमंत पाटील आणि त्यांचे सहकारी महेंद्र पाटील,  गणेश चौधरी ,  तुषार पाटील ,देवेंद्र राजपूत ,चंद्रकांत भाऊसाहेब पाटील इत्यादींनी शिंगावे कोव्हिडं सेंटरला जाऊन येथील व्यवस्थेचे माहिती घेऊन  रुग्णांची चर्चा केली. 
यात अनेक रुग्णांनी   येथे मिळत असलेले  जेवण हे निकृष्ट दर्जाचे असून  रुग्णांना वेळेवर चहा ,नाश्ता आणि जेवण मिळत नसल्याबाबत खंत व्यक्त केली. वास्तविकपणे  या  कोव्हिडं सेंटरवर  प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी  आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस आरोग्य सेवा देत आहेत. स्थानिक प्रशासन आणि नगरपालिका देखील त्यांना या कामात सर्वतोपरी सहकार्य करत आहे. या आपात्कालीन परिस्थितीत  प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा आपल्या परीने सर्वोत्तम सेवा देण्याच्या प्रयत्न करत असताना  खाजगी कॉन्ट्रॅक्टर मुळे  रुग्णांच्या नाराजी  आणि मनस्ताप त्यांना सहन करावा लागत आहे.
 त्यामुळे हेमंत पाटील यांनी सरळ येथील ठेका व काम  देण्यात आलेल्या  कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी संपर्क साधून  ते देत असलेले जेवण हे  निकृष्ट असून ते वेळेवर दिले  का जात नाही  याबाबत जाब विचारला  आणि यापुढे यात सुधारणा झाली नाही  तर याबाबत तक्रार करून कार्यवाही करण्याबाबत सुचित केले.


 कोव्हिडं केअर सेंटरला भेट दिल्यानंतर  हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने  तहसीलदार शिरपूर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली. ज्या ठेकेदाराला काम देण्यात आले आहे त्याच्याकडे पुरेपूर साधनांची उपलब्धता नाही आणि मनुष्यबळ नाही त्यामुळे रुग्णांना वेळेवर चहा ,नाश्ता आणि जेवण मिळू शकत नाही. त्यामुळे तहसीलदार शिरपूर यांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन ही समस्या सोडविण्याबाबत विनंती केली.
 तहसीलदार शिरपूर यांनीदेखील सर्व परिस्थितीचे अवलोकन करून तात्काळ ठेकेदार यांना याबाबत अवगत केले असून यापासून  आपल्या कामात सुधारणा करून रुग्णांना वेळेवर चहापाणी ,नाश्ता आणि जेवण याची सोय करून द्यावी. याबाबत  वेळोवेळी तहसीलदार स्वतः तपासणी करणार असून यादरम्यान काही कमी अथवा त्रुटी आढळून आल्यास ठेकेदार यांना काळया यादीत टाकण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार शिरपूर यांनी दिले आहे.
शिवाय या पुर्वीच शिंगावे कोव्हिडं केअर सेंटर ला काम करणारे डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी यांनी या ठेकेदाराला सूचना दिल्या होत्या मात्र दोन चार दिवस कामात सुधारणा होते आणि पुन्हा निकृष्ट जेवण आणि वेळेवर आहार मिळत नाही त्या मुळे वेळीच आम्ही वरिष्ठ अधिकारी यांना सूचित केले आहे अशी माहिती आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे .
 शिवाय  नगरसेवक हेमंत पाटील यांनी, पक्ष राजकारण  या सर्व बाबी दूर ठेवून  समाजसेवी दृष्टीने  शिंगावे कोव्हिडं केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांच्या आणि अधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला म्हणून  येथील रुग्णांनी आभार व्यक्त केले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने