नशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून . नाशिक -:महावितरणच्या नाशिक परिमंडळाअंतर्गत असणारे विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच आणि मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्र कार्यालयाचे नाशिकरोड येथील बिटको चौकातील विद्युत भवन आवारातील सुसज्ज इमारतीत स्थलांतर करण्यात आले . महावितरणचे प्रभारी मुख्य अभियंता संजय खंडारे यांच्या हस्ते मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले . यासह अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांसाठी असलेल्या विद्युत ग्राहक तक्रार निवारण मंच कार्यालयाचे उद्घाटन अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले , कार्यकारी अभियंता नीलेश चालीकवार , अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत चव्हाण ,प्रमोद झाल्टे आणि प्राजक्ता कुलकर्णी आदी उपस्थित होते . परिसरात महावितरणची परिमंडळ ,मङंळ पायाभूत आराखडा आणि ग्रामीण विभाग यासह इतरही अनेक महत्त्वाची कार्यालये असल्याने ग्राहकांना सुविधा आणि सहजता होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे . आधी ही दोन्ही कार्यालये शहराच्या मध्यवर्ती अशा बिटको चौकालगत होती परंतु ती जागा भाडेतत्त्वावरील होती . आता या कार्यालयापासून साधारणतः पाच ते सहा किलोमीटर दूरवर नवीन कार्यालय स्थलांतरित झाले आहे . पंचवटी , सातपूर , गंगापूर , कॉलेजरोड , मखमलाबाद येथील ग्राहकांना कार्यालय गाठण्यासाठी अधिकचा पल्ला गाठावा लागणार असल्याची प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे .
विद्युत ग्राहक सुविधा केंद्राच्या स्थलांतरीत कार्यालयाचे उदघाटन संपन्न्न
byMahendra Rajput
-
0
