शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्याची ओळख काही काळ स्पिरीटचा तालुका म्हणून रूढ झाली होती मात्र मागील काही काळापासून पोलिसांच्या सतर्कतेने धडक कारवाई करून बनावट दारू तस्करांचे धाबे दणाणले असून बनावट दारू प्रकरणांवर अंकुश लावण्यात शिरपूर शहर आणि तालुका पोलीस स्टेशन ला मोठ्या प्रमाणावर येत आहे.
असेच बनावट दारुसाठी उपयोगात येणारे स्पिरिट महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर आणण्यात आल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी दिनांक 7 ऑगस्ट रोजी एक पथक तयार करून शिरपूर तालुका येथील खैरखुटी वन शिवाराच्या परिसरात वनक्षेत्रात तपासणी सुरू केली असता खैरखुटी वनक्षेत्र नाल्याच्या काठी एक इसम पोलिसांना पाहून पळून जात असताना दिसून आला त्यास पोलीस शिपाई श्याम पावरा यांनी पाठलाग करून पकडले असता त्याला विचारपूस केली असता त्याचे नाव शामु भगत असे होते त्याने दिलेल्या माहितीवरून एका काडी व मातीचा झोपडीमध्ये स्पिरिट ने भरलेले 6 मोठी प्लास्टिकचे बॅरल आढळून आले. सदरच्या मुद्देमाल जप्त करून याठिकाणी 2 लाख 46 हजार रुपये किमतीचे लपवून ठेवलेले प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे 1200 लिटर स्पिरिट आढळून आले. या स्पिरिट चा वापर बनावट दारू तयार करण्यासाठी केला जाणार होता. यात आरोपी शामू भगत राहणार पळासनेर तालुका शिरपूर जिल्हा धुळे या अटक करून वरील मुद्देमाल जप्त करत पोलीस शिपाई योगेश दाभाडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 / ए व इ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील ,पोसइ खैरनार, पो.कॉ. लक्ष्मण गवळी ,पो.शिपाई योगेश मोरे श्याम पावरा , स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्या गस्ती पथकातील पोलिस नाईक अशोक पाटील, पोलीस शिपाई मयूर पाटील यांच्या पथकाने केली आहे.
सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित सो,अप्पर पोलीस अधीक्षक श्री राजू भुजबळ सो , उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने सो .यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
Tags
news


