सर्वांना शिक्षण हक्क ' प्रवेश प्रक्रियेच्या संथपणामुळे पालक अस्वस्थ,




                                     नाशिक  जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक -; महाराष्ट्र राज्य नवीन शैक्षणिक धोरणात ' सर्वांना शिक्षण हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष केंद्रित केले जात असताना चालू शैक्षणिक वर्षात सर्वांना शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करोनाच्या सावटाखाली संथ सुरू आहे . मार्चपासून सुरू झालेली प्रक्रिया सहा महिने उलटूनही अद्याप पूर्ण झालेली नाही . त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता आहे . कागदपत्रे , पालकांची आर्थिक क्षमता , लालफितीचा कारभार अशा अडथळ्यांमुळे या प्रक्रियेस दरवर्षी उशीर होतो . यंदा मार्चमध्ये यासाठी सोडत पद्धत नाकारत थेट विद्यार्थ्यांची निवड करण्यावर भर देण्यात आला ; परंतु करोना संसर्गामुळे ही प्रक्रिया यंदाही रखडली . राज्यातून नऊ हजार ३३१ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या असून ११ लाख ५४ हजार ४४ ९ विद्यार्थी या प्रक्रियेतून प्रवेश घेऊ शकतील . मार्चमध्ये या संदर्भात ऑनलाइन यादी प्रसिद्ध झाली . नाशिक जिल्ह्यात ४४७ शाळांमधून पाच हजार ५५७ जागा प्रवेशित आहे . सोडत पद्धतीने पाच हजार ३०७ विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला , तर २५० विद्यार्थ्यांचा प्रवेश प्रलंबित आहे . दुसरीकडे ज्या पाच हजार ३०७ विद्यार्थ्यांची निवड झाली त्यातील दोन हजार ६५७ विद्यार्थ्यांचा शाळेत हंगामी प्रवेश झाला , तर समितीने शिक्कामोर्तब केल्याने दोन हजार ३०० विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे . अद्याप प्रलंबित प्रवेशाची संख्या मोठी असताना शिक्षण विभाग मात्र करोनामुळे ही प्रक्रिया काहीशा धिम्या गतीने सुरू असल्याचे सांगत आहे  . शाळेत प्रवेश घ्यावा की प्रक्रिये अंतर्गत आपला क्रमांक येईल याची वाट पाहावी , या द्विधा मनःस्थितीत पालक अडकलेले आहेत . या पार्श्वभूमीवर काही पालकांनी या प्रक्रियेचा पाठपुरावा करणे सोडून दिले आहे . जवळच्या शाळेत आपल्या आर्थिक क्षमतेनुसार माध्यमाची निवड करत ऑनलाइन अभ्यासाला सुरुवात झाली  आहे . ग्रामीण भागात यंदाच्या वर्षी काहींनी मुलांना शाळेत न पाठविता प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहणेच पसंत केले आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने