नांदगाव तालुका हादरला नाशिक जिल्ह्यात खळबळ, एकाच कुटुंबातील चौघांची निर्घुण हत्या.



नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून             नाशिक-:नांदगाव  तालुक्यातील वाखारी ते जेऊर शिवारात आज पहाटे एकाच कुटूंबातील चौघांची निर्गुणपणे धारधार शस्त्राने निघृण हत्या करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे . या हत्याकांडामुळे नांदगाव - मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भाग हादरून गेला आहे . हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे मालेगावच्या पोलिसांनी हाती घेतले असून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले असून हत्यामागची  कारणे शोधण्यात येत आहे . या तपासातून महत्वाचा खुलासा होण्याची शक्यता आहे .
 याबाबत माहिती अशी , नांदगाव तालुक्यातील वाखारी येथील रिक्षाचालक असलेल्या समाधान चव्हाण ( वय ३८ ) याची पत्नी भारतीबाई ( ३० ) गणेश ( ६ ) व आरोही ( ४ ) हे नेहमीप्रमाणे जेऊर रस्त्यावरील मळ्यातील वस्तीवरील आपल्या निवासस्थानी झोपी गेले समाधान यांनी काल गुरुवारी जवळच असलेल्या जेऊर येथील मधुकर सांगळे यांच्याकडे कांदे भरण्यासाठी आपली मालवाहू रिक्षा नेली होती त्यातील काही कांदे भरून झाले व ते घरी आले व आज त्यांना कालचे काम पूर्ण करायचे होते . रिक्षाचालक समाधान  चव्हाण याला पहाटे पाच वाजेपासून मधुकर  सांगळे हे मालवाहुतुक करायची म्हणून सारखा फोन करीत होते मात्र          समाधान चव्हाण  फोन उचलत नव्हते म्हणून सकाळी मधुकर सांगळे संधान यांच्या वस्तीवरच्या घरी आले व समोरचे दृश्य बघून ते घाबरले कारण घरच्या ओसरीवर रक्तभंबाळ अवस्थेत सगळे कटूंबच निपचित अवस्थेत दिसले म्हणून ते लगेचच जेऊरला परतले त्यांनी सरपंच राजूभाऊ बोडके यांना ही बाब कळविली बोडके यांनी वाखारी चे पोलीस पाटील  राकेश चव्हाण यांना कळविले व हे सर्व पुन्हा घटना स्थळी आले त्यांनी नांदगाव - मालेगाव पोलिसांना ही बाब लगेचच कळविली .
नांदगावचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व त्यांचे पोलीस तातडीने दाखल झाले शिवाय मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे हेही तातडीने दाखल झाले आहेत त्यांनी तपासाच्या दृष्टीने परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्यात नाशिकहून ठसे तज्ञपथक  श्वान पथक सह ग्रामीण पोलीस अधीक्षक ङाॅ आरती सिंह दाखल झाल्याने  छोट्याश्या वस्तीवर एकाच कुटूंबातील चौघांची निघृण हत्या झाल्याचे वृत्त कळताच  वाखारी जेऊर साकोरी पाथर्डे आदी पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी ही हत्या   आर्थिक किंवा अनैतिक संबंध यातुन केल्या असाव्यात असा संशय ग्रामस्थ व पोलीस यांनी व्यक्त केला आहे या घटनेबद्दल  जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने