ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क संरक्षण समिती वतीने केंद्र नाशिक यांच्या वतीने महिलांना स्वयंरोजगार निर्मितीसाठी शिलाई मशीन वाटप ,

  



नाशिक  जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे यांजकडून नाशिक-: लॉकडाऊन काळामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचे रोजगार नसल्यामुळे  ऋणानुबंधन पुरुष व महिला हक्क संरक्षण समिती नाशिक यांच्या  वतिने कोपरगाव तालुका अध्यक्ष सौ.मंगलताई संजय आव्हाड  व समुपदेशन केंद्राचे संस्थापक  डॉ.राजेश साळुंके  यांच्याशी  चर्चा करून  मुर्शतपुत , दत्तवाडी ता.कोपरगांव ,जि. अहमदनगर येथे महिलांना स्वंयरोजगार निर्मिती व्हावी यासाठी   एक अनोखा उपक्रम हाती घेतला. " हाताला काम " या उपक्रमाच्या अंतर्गत  गरजु व होतकरू सुशिक्षित स्वयंरोजगार महिलांसाठी  गृहउद्योग सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले.अनेक प्रकारचे गृहउद्योग आहेत.पण महिलांना आवडेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल असा शिवणकला हा उद्योग निवडण्यात आला. महिलांना  वेगवेगळ्या शासकिय व खाजगी ठिकाणावरून  संस्थेच्या माध्यमातून  शिवण्यासाठी कपडे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  महिलांनी  रोजगार निर्मिती करून स्वतःच्या कुटुंबाचा  उदरनिर्वाह चालवण्यासाठी  मदत करण्यात होणार आहे . महिलांना स्वयंरोजगार मिळावा म्हणून महिलांचा ग्रुप तयार करून याठिकाणी हप्ता स्वरूपात हाफ शेटल, फुल शेटल आणि पिको- फॉल यासारख्या शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले .यासाठी  गणेश शिलाई मशीन संगमणेर  यांचे संचालक श्री गणेश टाक आणि त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांनी  यांनी मोलाचे सहकार्य केले .महिला मंडळाचे इतर कार्यकर्त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. मंडळाचे संस्थापक डॉ. राजेश साळुंके, सौ .सुचिता  साळुंके  अध्यक्ष, शांताराम भाऊ दुनबळे कार्यकारी अध्यक्ष, राणीताई गांगुर्डे उपाध्यक्ष ,अनुराधाताई गोविंद चांदवड तालुका अध्यक्ष व इतर सर्व कार्यकारी मंडळ यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले व या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महिलांना इतरही सर्व प्रकारचे अनेक गृहउद्योग महिला संस्थेच्या वतीने सुरू करण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे .यासाठी सौ .मंगलाताई आव्हाड या सतत प्रयत्नशील आहेत .तसेच शासनाच्या इतरही विविध योजना गरजू आणि होतकरू महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार आहेत. या कार्यक्रमात एकूण चोवीस महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यामध्ये  मुक्ता कुदळे, प्रिया रणशूर ,सविता रणशूर ,अनिता कोपरे ,सपना मोरे, मंगल भालेराव, प्रमिला दवंगे' लिलाबाई गुंजाळ ,दिपाली भालेराव ,प्रेरणा भालेराव ,शीतल भालेराव ,कोमल नवल ,सिंधुबाई रणशूर, आशा निर्मळ ,अनिता घोडेराव ,चंद्रकला काकडे ,निर्मला मोरे, वंदना पवार, हिराबाई पवार ,पुष्पा ढोले ,सरला मोरे ,नीता रणशुर , मीना मोरे, मोनाली ढोले इ.यांना शिलाई मशिन देण्यात आल्या.अशा प्रकारचा भव्यदिव्य असा मशीन वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला .अशाच प्रकारचा कार्यक्रम इतरही ठिकाणी  समुपदेशन केंद्राच्यावतीने सौ.मंगलताई आव्हाड यांच्या सहकार्याने घेण्यात येणार आहे .यासाठी कोपरगाव तालुका अध्यक्ष सौ .मंगलाताई आव्हाड या सतत प्रयत्न करणार आहेत.त्यांना मोलाची साथ श्री.संजयजी आव्हाड हे सतत देत आहे .त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने