शिरपूर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेतील प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावीत : भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी


शिरपूर : शिरपूर तालुक्यात आति सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत असतांना संपूर्ण तालुक्यातील उद्योगधंदे ठप्प झाले असुन राज्य सरकारने जनतेला वार्‍यावर सोडले आहे. विशेष म्हणजे कोरोणा महामारीची सर्वात जास्त झळ दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना बसत असून वयाची साठी घातल्या नंतर ज्येष्ठ नागरिकांना हक्काने व सन्मानपूर्वक जगण्यासाठी केंद्र व राज्य शासन सामाजिक न्याय विभागाकडून महिन्याला आता एक हजार रुपये अनुदान दिले जाते त्यांचे प्रकरण कोरोना आधी मंजूर झाले त्यांना शासनाने दोन हजार रुपये मदत केली तालुक्यातील अनेक पात्र लाभार्थी असून त्यांनी प्रकरण ऑनलाइन सादर केली असून त्यांची प्रकरणे गेली तीन ते चार महिन्यापासुन प्रलंबित आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना मानधनाला दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. उर्वरित प्राप्त प्रकरणे कोरोना काळात त्वरित निकाली काढावेत अशी मागणी भाजपा तर्फे करण्यात आली आहे. माजी मंत्री अमरीशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांचा मार्गदर्शनाखाली भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी तहसिलदार शिरपूर यांचाकडे निवेदनाव्दारे केली आहे. निवेदनात नमुद केले आहे कि जेष्ठ नागरिक, अपंगत्व, विधवा, परितकत्या, घटस्फोटित अश्या वंचित घटकांना कोरोना काळात दिलासा द्यावा. निराधार नागरिकांचे जगणे सु सह्या होणे गरजेचे आहे, निराधार व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असल्याने योजनांचा लाभ देण्या सोबत आर्थिक मदत करणे ही आवश्यक आहे जेणे करून दैनंदिनी जिवनावश्यक वस्तू सोबत औषधी खरेदी करण्यासाठी गरजेचे आहे तालुक्यातील संजय गांधी निराधार प्रकरणे गेल्या तीन ते चार महिन्यापासुन प्रलंबित आहेत. ते प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात यावीत अशी मागणीचे निवेदन भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांनी शिरपूर तहसिलदार यांना दि. ११ आॅगस्ट रोजी दिले आहे. शिरपूर तालुक्यातील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील असे तहसिलदार आबा महाजन यांनी यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी यांना आश्वासन दिले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने