शहादा प्रतिनिधी अश्विन सोनवणे
वडाळी ते काकरदा हा गेल्या दोन वर्ष अगोदरच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपये खर्च करून रस्ता बनवण्यात आला मात्र वडाळी गावालगतच्या रंगूमती नदीवर त्याअगोदरच पूल बनवणे गरजेचे असताना नदीपात्रात दरवर्षी पावसाळ्यात पूर आला की प्रचंड प्रमाणात परिसरातील नागरिकांचे हाल होत असतात म्हणून त्वरित पूल बांधण्याची मागणी परिसरातील नागरिकांना होत आहे
शहादा तालुक्यातील वडाळी ते काकरदा खुर्द आणि दिगर दैनंदिन या गावांचा रोजचा संपर्क वडाळी येथे येत असतो गाव तेथे रस्ता व्हावा या शासनाच्या छोटी गावे मोठ्या गावाला करण्याच्या उद्देशाने खासदार डॉ हिना गावित माजी मंत्री तथा आमदार डॉ विजयकुमार गावित जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या प्रयत्नांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत नव्याने चार कोटी रुपये खर्च करून नव्यानेच रस्ता तयार झाला व त्याच्यामुळे का करता हे अंतर काकरदा व अभाणपुर हे गावे वडाळी पासून फक्त सहा किलोमीटरचे अंतर कमी झाल्याने दोघही गावांचा रोजचा दैनंदिन व्यवहार वडाळी गाव बाजारपेठेचे जोडला गेला खरोखरच विकासाला चालना मिळाली काकरदा वडाळी ग्रामस्थांना पावसाळ्यात 2 ते 3 महिने भरपूर प्रमाणात पाणी राहत असल्याने रंगूमती नदीला पुळे नसल्यामुळे दोघंही गावांचा संपर्क हा तुटत असतो व काकर्दे वासियांना पुन्हा ते दिवस पुन्हा मागचे दिवस बघायला मिळतात त्यांना तोरखेडा किंवा तरी येथे ते बारा ते पंधरा किलोमीटर अंतर कापून पायपीट करत वडाळी तोरखेडा येथे बाजारपेठेत जावे लागते वडाळी येथील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती ही नदीच्या पलीकडे असल्यामुळे त्यांनाही नदीच्या पाण्यात उतरून संघर्ष करीत प्रवास करावा लागतो वास्तविक मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार कोटी रुपये खर्च करून नव्यानेच रस्ता केला त्या अगोदर रंगुमती नदीवर पूल बांधणे गरजेचे असताना प्रशासनाने मात्र ते दुर्लक्षितच केले असल्याचे काकर्दा दिगर खुर्द अभानपुर येथील ग्रामस्थ संतप्त सवाल करीत आहे ग्रामस्थांची नव्याने पूल बांधण्याची मागणी करीत आहे
Tags
news
