बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर धुळे जिल्ह्यात गोवंश जनावरे व मास वाहतूक करणाऱ्या विरुद्ध 32 गुन्हे दाखल - पोलीस अधीक्षक धुळे

 



 धुळे प्रतिनिधी  धुळे जिल्ह्यात बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दलातर्फे दिनांक 15 जुलै 2020 ते 02 ऑगस्ट 2020 यादरम्यान गोवंश जनावरे वाहतूक व गोवंश मास वाहतूक करणाऱ्या च्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम, पशु क्रूरता अधिनियम ,महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 119 अंतर्गत एकूण 32 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .



सदर कारवाईत एकूण एक करोड 39 लाख 66 हजार 310 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या कारवाईत 29 वाहने जप्त करून ,379 जनावराची सुटका करून त्यांना विविध गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. धुळे जिल्हा पोलीस दलाने वेळोवेळी सदर बेकायदेशीर कृत्यांवर मिळालेल्या खबरी नुसार कायदेशीर कारवाई केलेली आहे आणि यापुढेही करत राहणार आहेत. परंतु काही समाज विघातक प्रवृत्ती पोलिसांवर आरोप करण्याचा प्रयत्न करत असून खोट्या अफवा पसरवत असल्याचे निदर्शनास येत आहे.
 सध्या धुळे शहर व जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रसार होत असून त्याला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस गार्ड त्यात वाढ झालेली असून पाटील मोठे मनुष्यबळ या कामी तैनात आहे  तरी देखिल बेकायदेशीर  कत्तलीसाठी गोवंश वाहतुकीची माहिती वरून तात्काळ कारवाई करण्यात आलेल्या आहेत.
 धुळे पोलीस दलाच्यावतीने धुळे शहर जिल्ह्यातील   नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते आहे की कोणत्याही अफवांना बळी पडू नका बेकायदेशीर कत्तलीसाठी गोवंश वाहतुकीची माहिती दिल्यास तात्काळ कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक मा. चिन्मय पंडित सो यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने