15 ऑगस्ट 2020 रोजी उदगीर तालुक्यात होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये दिव्यांगाचे प्रश्न प्राधान्याने घेण्यात यावे प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी




 उदगीर प्रतीनिधी राहुल शिवणे तालुक्यातील 15 आँगस्ट 2020 भारत स्वतंत्रदिनादिवशीच्या सर्व ग्रामस्तरावर होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सर्व दिव्यांग बांधवांच्या अडचणी संदर्भातील प्रश्न घेऊन ग्रामीण भागातील दिव्यांगाना न्याय देण्यात यावा.दिव्यांग घरकुल योजना,5% निधी, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळातील दिव्यांगाना मदत,14 व्या वित्त आयोगातील निधी खर्च करणे,अपंग कल्याण निधीतून शौचालयाची अर्धवट कामे तात्काळ पूर्ण करणे,दिव्यांग व्यक्तीना मनरेगा योजनाअंतर्गत जाँबकार्ड मिळवून देणे,सुगम्य भारत योजनेमध्ये ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी सुख सोयी उपलब्ध करून देण्यात यावा.असे निवेदन मा .उपजिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले.
निवेदन देताना उदगीर तालुकाध्यक्ष  विनोद तेलंगे तालुका उपाध्यक्ष महादेव मोतीवपळे , तालुका उपाध्यक्ष संदीप पवार ,तालुका सह संपर्क प्रमुख सुनील केंद्रे , तालुका सह सचिव महादेव आपटे , तालुका सचिव दत्तात्रय जांभळे , संदीप लक्ष्मण सूर्यवंशी, गणेश सोपानराव कांबळे, सुनील सुर्यवंशी , इतर प्रहार सेवक उपस्थित होते ...

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने