शिरपूर - श्री ब्राह्मण सभा शिरपूर यांनी आवाहन केले आहे की कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन महिन्यांपासून पासून राज्यात व शहरात लॉकडाउन लागू आहे.आपण सर्व सुज्ञ नागरीक सोशल डिस्टनसींग चे काटेकोरपणे पालन करून कोरोना विरुद्धच्या या लढाईत महत्वाची भूमिका पार पाडीत आहोत. या दरम्यान आलेल्या रामनवमी, गुडीपाडवा या सह विविध धार्मिक उत्सव आपण घरातल्या घरात साजरे करून आपली श्रद्धा व आस्था जोपासली आहे.
या आठवड्यात शुक्रवार दि. ५ जुन २०२०, रोजी वटसावित्री सण येत आहे. शासन व पोलीस प्रशासनाच्या सुचने नुसार तसेच शहरातील सद्यपरिस्थिती पाहता सार्वजनिक आरोग्याची सुरक्षितता व आपले हित लक्षात घेऊन श्री ब्राह्मण सभा शिरपूर व समस्त ब्रम्हवृंद यांनी या वर्षी वटसावित्रीला वडाजवळ कुठलाही धार्मिक कार्यक्रम आयोजित न करण्याचे तसेच पूजेसाठी वडाच्या झाडा जवळ कुणीही ब्राह्मण (गुरुजी/महाराज) यांनी उपस्थित न राहण्याचे ठरविले आहे.
तरी सर्व सौभाग्यवती स्त्रीयांनी हा सण आपापल्या घरातच साजरा करून आपल्या परंपरेचे पालन करावे असे आवाहन श्री ब्राह्मण सभा शिरपूर व समस्त ब्रह्मवृंदांच्या वतीने करण्यात येत आहे.
Stay Home ,Stay Safe
