पुणे शहरात कोरोनामुळे बारा बलुतेदारांसह टपरीधारक, रिक्षाचालक मोठा वर्ग अडचणीत सापडलेला आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे खा. गिरीषभाऊ बापट यांनी स्पष्ट केले.
यावेळी मा उपमहापौर सुरेश नाशिककर, बारा बलुतेदार समाज विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी,नगरसेवक आदित्य माळवे,उस्तवप्रमुख रोहीत यवतकर, शिंपी समाजाचे नेते संजयराव नेवासकर,संदीप लचके, कुंभार समाजाचे नेते सुधीर चांदेकर,चारुदत्त शिंदे, नाभिक समाजाचे नेते सुनिल पांडे, सोनार समाजाचे नेते अजय डहाळे,कसबाध्यक्ष प्रमोद कोंढरे विनायक कदम मधु सगरी,बापू भावे आदी अनेक समाजाचे नेते उपस्थित होते
खा.गिरीषभाऊ बापट यांनी कलेक्टर नवलकिशोर राम यांना फोन करुन केशकर्तनालये, शिंपी व रिक्षाचालक आदिंचे व्यवसाय कधी सुरु होणार याबाबत प्रश्न विचारुन त्यांना मदत करण्याबाबत प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
तसेच स्वतः अन्नधान्य व काही प्रमाणात रोख स्वरूपात अत्यंत गरजूंना मानधनातून मदत करण्याची तयारी दर्शवली
यावेळी बलुतेदार समाजाच्या समस्या रामदास सूर्यवंशी, रोहीत यवतकर यांनी तर शिंपी समाजाच्या वतीने संजयराव नेवासकर,संदीप लचके, रोहीत यवतकर, नाभिक समाजाच्या वतीने रामदास सूर्यवंशी,सुनील पांडे , कुंभार समाजाच्यावतीने सुधीर चांदेकर, चारुदत्त शिंदे, परीट समाजाच्यावतीने सुरेश नाशिककर आदींनी त्यांच्या समाजाच्यादृष्टीने भेडसवणा-या अडचणी काही मते तसेच प्रशासनाकडून अपेक्षित मदतीबाबत सूचना खासदारांच्या समोर व्यक्त केल्या त्यावर खासदारांनी त्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी काही मते व्यक्त केली प्रसंगी बलुतेदारांच्या प्रश्नी आंदोलन गरज पडल्यास करु अशी भावना व्यक्त केली.तसेच सोमवारी कलेक्टर यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.
