नंदुरबार : जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६ वर्षाच्या चिमुकलीसह ६६ वर्षीय वयोवृद्धाने कोरोनावर मात केली आहे . या दोघांसह एकूण ९ रुग्ण कोविड संसर्गमुक्त झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले . यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . आर.डी. भोये , डॉ . के.डी. सातपुते सह जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते . यावेळी डॉ.भोये यांनी कोरोना रुग्णाना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले . संसर्गमुक्त झालेल्या रुग्णात रजाळे येथील चिमुकलीसह २८ वर्षीय व ६६ वर्षीय महिलांचा तसेच ३१,३५ आणि ६६ वर्षे वयाच्या पुरुषांचा समावेश आहे . शिंदखेडा तालुक्यातील ३५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि जिल्हा रुग्णालयातील २ कर्मचारी देखील संसर्गमुक्त झाले आहेत . जिल्ह्यात उपचारानंतर संसर्गमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २८ असुन ३ रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे . अन्य ३ करा नाबाधितांचा यापुर्वीच मृत्यू झाला आहे . कोरोना हा उपचाराअंती या रोग बरा होत असल्याने नागरिकांनी आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरीत जिल्हा रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी , असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
नंदुरबार आनंदवार्ता; सहा वर्षांच्या चिमुकलीची कोरोनावर मात नंदुरबार नऊ रुग्ण कोरोना संसर्गमुक्त होऊन घरी परतले
byMahendra Rajput
-
0
