दोंडाईचा - येथे नुकत्याच दोन दिवसापासुन बंद खोलीत एकाचा मृत्यू झाला असून, शेजारच्यांचा सतर्कतेमुळे घटना लक्षात येउन प्रशासनान पुढील तपास कामात लागले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, न्हावी समाजाचा व्यक्ती मयत श्री राजेंद्र वेडू हिरे (वय ५५) मुळ राहणार साक्री, हल्ली मुक्काम दोंडाईचा येथील डालडा घरकुल येथे अनेक वर्षांपासून वास्तव्यास होता. दोन दिवसांपूर्वी शेजारच्या लोकांनी त्याला पाहिले होते. नंतर दोन दिवसापासून त्याचे घर बंद होते. शेजारच्या लोकांना दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात व नगरपालिका प्रशासनास कळविले. प्रशासनाने तातडीने मयत व्यक्ती व शेजारचा परिसर सॅनिटायझर केला. तसेच त्याच्या नातेवाईकांना कळवत पुढील कार्यवाहीस सुरूवात केली.
मयत व्यक्ती श्री राजेंद्र हिरे हा न्हावी समाजाचा असुन लाॅकडाऊन काळात त्याच्यावर उपासमारीची वेळ आली होती. अनेक वर्षांपासून तो येथे एकटाच राहत होता. त्याची पत्नी व दोन मुले मागेच वारले आहेत. त्याच्यापश्च्यात त्याला दोन विवाहित मुली,भाऊ असा परिवार आहे.
