शिरपूर (प्रतिनिधी)
शिरपूर येथे डॉक्टर्स क्लब तर्फे तहसील ऑफिस येथे महसूल कर्मचारी, तहसीलदार श्री आबा महाजन, निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी' भामरे, चौरे, परदेशी नाना,वाडिलें,अव्वल करकून पी पी ढोले, विजय पाटील , के पी खैरनार, बागुल नाना,श्रीमती निळे मॅडम, श्रीमती सावळे मॅडम, श्रीमती शुभांगी चव्हाण, नीता वाघ , श्रीमती वाळूजकर, श्रीमती गावित, जगताप मराठे, नाईक, जयेश धाकड, येवला नाना, तलाठी, सर्कल ऑफिसर व महसूल ऑफिसातील सर्व कर्मचारी यांची थर्मल स्कॅनिंग, पल्स ऑक्स मीटरने आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी डॉक्टर्स क्लब शिरपूरचे अध्यक्ष डॉ. सुनील ईशी यांनी होमिओपॅथीक औषधाने कोरोना प्रतिबंधक रोग प्रतिकार शक्ती कशी वाढते याचे अनेक उदाहरणे देऊन समजावून सांगितले. व होमिओपॅथी औषधांची काहीही दुष्परिणाम होत नाही असेही सांगितले.
डॉ. सुनिल ईशी व डॉ. सौ कांचन ईशी यांच्या साई सृष्टी क्लीनिक कुंभार टेक शिरपूर* यांच्यातर्फे कोरोना वॉरियर्स म्हणून त्यांना मोफत होमिओपॅथिक रोग प्रतिकार शक्तीवाढवण्याचे औषध वाटप केले. तसेच शिरपूर येथील प्रसिद्ध फिजिशियन डॉ. प्रज्ञेश शहा यांनी कोरोना या आजाराचे लक्षणे व त्या आजाराची गांभीर्य याविषयी माहिती सांगितली. तसेच डॉक्टर क्लबचे सचिव डॉ अनिल पाटील यांनी साथीच्या आजारात आपली दिनचर्या व आयुर्वेद पद्धतीने आपल्या शरीराची काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले. व आयुष मंत्रालयाने सुचविलेल्या काढ्याविषयी माहिती सांगितली.
प्रस्तावना तहसीलदार आबा महाजन साहेब यांनी केली व होमिओपॅथी औषधाविषयी आपले मित्रां तर्फे मिळालेली माहिती व अनुभव सांगितले व या आजारावर होमिओपॅथिक औषध किती गुणकारी आहे याचे महत्व सांगितले व डॉक्टर्स क्लबचे या गंभीर परिस्थितीत मिळत असलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच डॉ. सुनील ईशी अध्यक्ष डॉक्टर्स क्लब व डॉ. कांचन ईशी यांचे स्वखर्चाने कोरोना वॉरियर्स यांना मोफत औषधी वाटपाचे विशेष कौतुक केले.
याकामी डॉक्टर्स क्लबचे बॉडी मेंबर्स व सभासद डॉ. मनोज निकम डॉ.दीपक बागुल डॉ. प्रवीण महाजन डॉ. आशिष अग्रवाल डॉ. श्रेयस भंडारी डॉ. सचिन पाटील डॉ. गुंजन पाटील डॉ. विशाल पाटील डॉ. लोकेश वैद्य यांचे अनमोल सहकार्य लाभले. महसूल विभागातर्फे नायब तहसीलदार यांनी आभार मानले.
