शिरपूर तालुक्यात पुन्हा धोक्याची घंटा,आमोदे गावात आढळला एक कोरोना पॉझिटिव्ह



शिरपूर दि.11
शिरपूर  तालुक्यातील आमोदे येथेच तिसरा पॉजिटीव्ह रुग्ण  सापडला आहे. तो सेक्युरिटी गार्ड आहे. आताच बडवानी येथून आल्याची माहिती मिळाली आहे.आमोदे येथे राहणारा व सेक्युरिटी गार्ड असलेला पॉझिटिव्ह आढळला आहे.प्रशासन रात्रीच हरकत मध्ये आले असून आमोदे गाव सील करण्यात आले आहे. या अगोदरही दोन रुग्ण हे  गावातच आढळलेले  होते. व परिस्थिती सामान्य झाली होती.या रुगणाच्या संपर्कात आलेल्या 6 लोकांना तात्काळ ताब्यात घेवून तपासणी साठी पाठवण्यात आले आहे. 

जाहीर सूचना

शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहर परिसरात आमोदे येथे कोरोनाचा रूग्ण आढळला असल्याने संपूर्ण शिरपूर शहर, आमोदे, कळमसरे, मांडळ या गावांमध्ये दि. १२ मे २०२० ते दि. २६ मे २०२० या चौदा दिवसांच्या काळात कंटेन्मेंट झोन* जाहीर करण्यात येत आहे. *दि.१२ मे ते १५ मे २०२० या तीन दिवसांच्या काळात  शहरातील हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. 
लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश मा . प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यांनी दिले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने