करोना प्रतिबंधक होमियोपॅथी औषधी यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपुरला वाटप



शिरपूर -
आयुष मंत्रालय यांनी शिफारस केलेले होमियोपॅथी चे औषध आज रोजी दानशूर व्यक्तीनी केलेल्या आर्थिक मदतीतून,कायम जनतेच्या समपर्कात असणारे व शेतकरी राज्याच्या मदती साठी तत्पर असलेली संस्था म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपुर येथे कार्यरत असलेले सुमारे ५०० कुटुंब ३००० व्यक्तींना वाटप केले. अँड.सुहास वैद्य,डॉ योगेश जाधव,डॉ नितीन वैद्य, अशोक बाफना, संदीप जैन,प्रसन्न वैद्य,नृपेश मुळे,अभिराज वैद्य वगैरे दानशूर समाज सेवकांनी आयोजन केले होते त्या वेळी  बाजार समिती अध्यक्ष सो नानासो नरेंद्रसिंग सिसोदिया, सो व्यापारी असोसिएशन चे  अध्यक्ष कैलास अग्रवाल,युवराज जैन,मोहन पाटील,अखिल अग्रवाल,गोटू शेट अग्रवाल,हमाल मापडी चे  अध्यक्ष,चांदे व कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने हजर होते.गावागावात जाऊन औषधें वाटण्याच्या उपक्रमास जनते कडून मोठा प्रतिसाद व निधी उपलब्ध होत असून पुढे सँनेटराईझ कक्ष उभारण्याचे देखील नियोजन असल्याचे सांगण्यात आले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने