शिरपूरला थर्मल स्कॅनिंग,कोरोना मुळे तपासणीला वेग




धुळे जिल्ह्यात सध्या शिरपूरला कोरोना पाॅझिटीव्ह पेशंटचे प्रमाण वाढत आहे.एक प्रकारे हाॅटस्पाॅट बनत आहे.म्हणून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.नागरिकांनी यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. शहरातील सर्व नागरिकांची एकाच वेळी स्वॅब टेस्ट घेणेही कठीण आहे.यासाठी प्राथमिक स्तरावरील थर्मल स्कॅनिंग,पल्स ऑक्सिमीटरच्या साहाय्याने तपासणी करणे आवश्यक आहे.म्हणुन शिरपूर नगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्र 1,2, मध्ये नागरिकांची तपासणी मातोश्री बनुमाय प्राथमिक विद्यालयात सुरू झाली आहे.सुमारे तीन-चारशे नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन योग्य मार्गदर्शन करण्यात येत आहे.यावेळी डाॅ.श्रेयश ठाकरे,डाॅ.सुशील वाघ वैद्यकीय तपासणी करत असुन यावेळी नगरसेवक रोहित रंधे,हेमंत महाजन,राज शिसोदे,प्रा.अनिल लुंगसे,मुन्ना राजपुत योगेश पाटील,दिपक पवार,रोहन कलाल इ.परीश्रम घेत आहेत.जास्तीत जास्त नागरिकांनी तपासणी करून घ्यावी व शहर सुरक्षित ठेवावे असे आवाहन नगरसेवक रोहित रंधे यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने