साधु साध्वी यांना चातुर्मास पोहोचवण्यासाठी प्रवास करण्याची परवानगी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे मनस्वी आभार - महावीर जैन



 
      - जैन समाजाच्या चातुर्मास पर्वास जुलै महिन्यात प्रारंभ होत असून या चातुर्मास काळात जैन समाजाचे साधु साध्वी निश्चित केलेल्या चातुर्मास स्थळी पोहोचण्यासाठी पायी प्रवास करीत असतात काही वृद्ध साधु साध्वी प्रकृतीच्या कारणास्तव वरील चेअरने  प्रवास करतात या प्रकारे प्रवास करून हे साधु साध्वी चातुर्मास स्थळी त्यांच्या सेवक वर्गासह पोहोचतात.
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे अनेक भागातून साधू साध्वी  प्रवास करू शकत नाहीत परंतु चातुर्मास सुरू होण्यापूर्वी त्यांना त्यांच्या निर्धारी स्थळी पोहोचणे आवश्यक आहे त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिनांक २८-०५-२०२० रोजी शिवसेना उपतालुका प्रमुख ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी केली होती.
   त्यामुळे जैन समाजाच्या साधू साध्वी व सेवक वर्ग या यांना त्यांच्या चातुर्मास  स्थळी पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे. व काही राज्य सरकारने अटी दिल्या आहेत पायी प्रवासा दरमान्य गर्दी होणार नाही व ५ पेक्षा जास्त जण एकत्रित प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी. ज्या ठिकाणी त्यांच्या मुक्काम आहे त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. प्रवास दरम्यान  दोन व्यक्तींमध्ये पुरेसे अंतर ठेवावे असे काही नियमावली देण्यात आली आहे
 या निर्णयाचे जैन समाजाकडून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे स्वागत होत आहे धुळे जिल्ह्यात विहार मध्ये कुठेही अडचण आल्यास तर  संपर्क साधा महावीर जैन (९६६५३३८५३३)

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने