सोशल डिस्टंन्सिंग चे पालन करत वरवाड़े येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजने अंतर्गत तांदूळ वाटप



शिरपूर - वरवाड़े येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत इ.1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आला.कोविड 19 या आजाराने जगात धुमाकूळ घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने 15 मार्च 2020 पासून शाळा बंद चा निर्णय घेतला आहे. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्याना शालेय पोषण आहार शिजवून दिला जातो. परंतुशाळा बंद आहेत अशा परिस्थितीत पोषण आहात शिजवण्याचे काम बंद आहे. त्यामुळे शाळेत तांदूळ शिल्लक आहे.म्हणून शासन आदेशाप्रमाने उर्वरीत तांदूळ विद्यार्थ्यांना  वाटप करण्याचे आदेश आहेत. सदर आदेशाचे पालन करत व सोशल डिस्टंसिंग चे पालन करत इ. 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आला.यावेळी मुख्याध्यापक गोपाल पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी हजर होते. त्यांच्या देखरेखीत सर्व विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्यात आला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने