शिरपूर - शिरपूर तालुक्यात सर्व प्रथम अमोदा गावात कोरोना चा शिरकाव झाला होता. येथील दोन रुग्ण बरे झाल्यानंतर एक रुग्ण बाहेर गावाहून आला होता तो देखील पॉझिटिव्ह आला होता. दरम्यान तालुक्यातील अर्थे येथील मूळ गाव असलेला एस आर पी एफ जवानाचा धुळे येथे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता.त्या नंतर धुळे येथून शिरपूरतालुक्यातील अर्थे येथे आलेल्या जवानाच्या पत्नीला व त्याच्या लहान मुलीची तपासणी केली असता त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह मिळुन आला.यानंतर शिरपूर प्रशासन मार्फत जवानाच्या आई-वडीलांना शिंगावे येथील कोवीड केअर सेंटर येथे पाठवून दि १४ रोजी धुळे येथे तपासणी साठी पाठवण्यात आले होते.मात्र तेथून हे व्रुध्द दाम्पत्य विनातपासणी करता सायंकाळी शिरपूर येथील प्लॉटवर दिसुन आले. यामुळे ऐकच खळबळ उडाली होती.स्थानिक प्रशासनाने पुन्हा त्या व्रुध्द दामपत्याला शिंगावे कोवीड सेंटर येथे पाठवुन दुसऱ्या दिवशी त्यांची तपासणी करण्यात आली.काल रात्री त्या व्रुध्द दामपत्याचा अहवाल पॉझिटीव्ह झाल्याचे निष्पन्न झाले आहे.यामुळे प्रशासनाची चिंता वाढली असून या पूर्वी च्या रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वच नागरिक निगेटिव्ह आले होते त्यामुुळे दिलासा मिळाला होता मात्र आता या रुग्णाचा संपर्कात कोण आले याचा शोध घेतला जात असून पुढील कारवाही केली जात आहे.
