भुपेशभाई पटेल यांच्याकडून होळनांथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आर. ओ. वॉटर कुलर भेट



शिरपूर - प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांच्या कडून मोफत आर. ओ. वॉटर कुलर भेट स्वरूपात तालुक्यातील होळनांथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देण्यात आली.

होळनांथे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील अनेक रुग्ण आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी येत असतात. रुग्ण तसेच येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांची गरज पाहता वॉटर कुलर बसविण्यात आले.भुपेशभाई पटेल हे नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून इतरांना मदत देण्यासाठी तत्पर असतात. भर उन्हाळ्यात रुग्ण व डॉक्टर, कर्मचारी यांनाही पिण्याचे स्वच्छ व निर्जंतुक पाणी मिळावे या समाज सेवेच्या भावनेतून उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी आर. ओ. वॉटर कुलर भेट दिले.

याबद्दल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता निशाणे, औषध निर्माता राजेंद्र पावरा, आरोग्य सेविका डी. ई. चौधरी, डी. एस. पाटील, पी. जे. सोनवणे, पी. व्ही. पवार तसेच ग्रामस्थ यांनी आदींनी आभार व्यक्त केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने