मुकटी येथे डॉ,राहुल साळुंके यांचा उपक्रम आ,कुणाल पाटील यांच्या उपस्थित नागरिकांना होमिओपॅथी औषधांचे वाटप




मुकटी,:- संपूर्ण देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जात असून,या कोरोना - १९ (कोरोना विषाणू ) ने धुळे जिल्ह्यात शंभरी पार केली आहे,दिवसेंदिवस जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढताना दिसून येते आहे,याच पार्श्वभूमीवर मुकटी येथील डॉ,राहुल साळुंके यांच्या तर्फे  जागतिक महामारीवर रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी भारत सरकार आयुष मंत्रालय यांनी शिफारस केलेले आर्सेनिक अल्बम ३० हे होमिओपॅथी १ हजार औषधी बाटल्यांचे वितरण धुळे ग्रा,चे आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांना करण्यात आले, यावेळी सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळून या औषध वितरित झाले,यावेळी आ,कुणाल पाटील यांनी सांगितले की कोरोनापासून तुम्ही सुरक्षित रहा,नातेवाईकांना सुरक्षित ठेवा,आहार व होमिओपॅथी च्या गोळ्या वेळोवेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे,कोरोना महामारीच्या काळात होमिओपॅथी गोळ्यांचे शस्त्र हाती घेऊन डॉ,राहुल साळुंके यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली असून त्यांच्या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले,यावेळी आ,कुणाल पाटील,डॉ,राहुल साळुंके,गावाचे सरपंच चतुर पाटील प,स,सदस्य पंढरीनाथ पाटील,कृउबा,उपसभापती रितेश पाटील,जि,प,सदस्य विशाल पाटील,युवक काँग्रेसचे मा,जिल्हाध्यक्ष हर्षल साळुंके,प,स,मा,सदस्य छोटू चौधरी,जितेंद्र साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते,

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने