होळनांथे/प्रतिनिधी
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त येथील दक्ष नागरीक युवा मंच तर्फे महाराणा प्रतापसिंह यांच्या पूर्णाकृती मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर महाराणा प्रतापसिंह यांची जयंती साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली, दक्ष नागरीक युवा मंचाचे होळनांथे शाखाध्यक्ष शैलेंद्रसिंग राजपूत यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला, यावेळी संस्थापक अध्यक्ष योगेश पाटील, सौरभसिंग राजपूत आदींची उपस्थिती होती.
