बाल-गोपाळांनी साजरी केली महाराणा प्रताप जयंती




शिरपूर तालुक्यातील बोरगाव येथे चिलबील मंडळींनी आपल्या घर परिसरात महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली. 

स्वत: मातीच्या सहाय्याने महाराणांची मुर्ती बनवली व घरच्या घरी डीजे तयार करुन वाजत गाजत जयंती साजरी  केली.

लॉकडाऊन मुळे ज्येष्ठ मंडळी राणा प्रताप जयंती साजरी करु शकले नाहीत पण बोरगावातील हया चिमूकल्यांनी आपली शक्कल लढवत व कोरोना नियमांचे पालन करत राष्ट्रगौरव महाराणा प्रताप जयंती साजरी करून महापुरुषाचा गौरव केला.

ह्या आयोजनात 5वीत शिकणारा निखील योगेंद्रसिंग सिसोदीया याला रनविरसिंग, कावेरी, पिऊ यांनी साथ दिली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने