मला जगू द्या आणि तुम्ही जगा - हर्षवर्धन जाधव




कन्नड - कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याच आठवड्यात राजकारणातून निवृत्ती घोषित केली. दरम्यान, त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, आता जाधव यांनी काल यूट्युबवर एक 19 मिनिटांचा व्हिडिओ पोस्ट करून सासरे तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
‘मला जगू द्या आणि तुम्ही जगा. पुन्हा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी जीव देईन आणि तुम्हाला अडचणीत आणीन,’’ अशी धमकी जाधव यांनी या व्हिडिओतून दिली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत जाधव म्हणाले, रावसाहेब दानवे हेच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत.
2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेनेकडून ऑफर होती, पण, ती माझ्यापर्यंत पोचवली गेली नाही. कारण ती जबाबदारी तुमच्यावर (रावसाहेब दानवे) होती. मी त्याचवेळी आमदार झालो असतो. त्यावेळच्या निवडणुकीत मला बंगला विकावा लागला. त्यावेळी पडलो. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा निवडणुका आल्या. त्याहीवेळी पैसे नव्हते, आम्ही आमची मिटमिट्याची जमीन विकली. जी तुम्हीच अत्यंत कमी दरात घेतली. आम्हाला गरज होती. त्यामुळे आम्ही काही म्हणालो नाही. 2009 मध्ये मी आमदार झालो नंतर 2014 ची निवडणूक जिंकली. तुम्हीच माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला त्रास देत आहेत. मला जगू द्या आणि तुम्ही जगा असे  हर्षवर्धन जाधव यांनी म्हटले असून आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने