शिरपूर येथील एस.पी.डी.एम.कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर व शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे 29 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील 544 तज्ञ सहभागी झालेले आहेत.विविध राज्यातील क्रीडा विभागातील काम करणारे क्रीडाशिक्षक,प्रशिक्षक.मार्गदर्शक. विद्यार्थी खेळाडू तसेच तज्ञ प्राध्यापक वर्ग यात सहभागी होत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उत्तर प्रदेश, तामिळनाडू,कर्नाटक,केरळ, मध्यप्रदेश,मनिपुर,त्रिपुरा,जम्मू काश्मीर,आसाम,झारखंड,पश्चिम बंगाल,गुजरात,राजस्थान,हरियाणा, पंजाब या राज्यातील तज्ञ मार्गदर्शक सहभागी होत आहेत.या परिषदेचे उद्घाटन किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.तुषार रंधे यांच्या हस्ते होणार.आहे प्रमुख अतिथी म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे, संस्थेच्या खजिनदार श्रीमती आशाताई रंधे,संस्थेचे विश्वस्त आणि नगरसेवक श्री रोहित रंधे,व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.एन.पटेल हे उपस्थित असतील.या परिषदेला आंतरराष्ट्रीय क्रीडा अभ्यासक डॉ.हू वांग वा,राष्ट्रीय विद्यापीठ तैवान,डॉ.चुंग बैंग हॉंगकॉंग हे मार्गदर्शन करतील.तसेच पहिल्या सत्रात लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण विद्यापीठ ग्वाल्हेर येथील प्रोफेसर आशिष फलकर हे कोरोना "महामारीनंतर शिक्षण क्षेत्रावर होणारे बदल आणि त्याचे व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत .दुसऱ्या सत्रामध्ये हे भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक एस.के.पाल हे "कोरोना महामारीनंतर चे खेळाडू व क्रीडाक्षेत्र" यावर होणारे परिणाम या विषयावर मार्गदर्शन करणार असून, तृतीय सत्रामध्ये एस.अर्चना मनी मालती,तमिळनाडू या "कोरोना महामारीनंतर खेळाडू महिला व स्पर्धा एक आव्हान" या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.सदर आंतरराष्ट्रीय परिषदेचे लाईव्ह प्रसारण युट्युब,झूम आणि फेसबुक यावर होणार असून याचा लाभ शिक्षण व क्रीडा क्षेत्रातील सहभागी सर्वांनी घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन. पटेल यांनी केले आहे.सदर कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रा.दिनेश पाटील,प्रा.डॉ. महेंद्र पाटील,नॅक समन्वयक प्रा.डॉ. दिनेश भक्कड आणि परिषदेचे समन्वयक डॉ.एल.के.प्रताळे हे करत आहेत.
उद्या शिक्षण व शारीरिक शिक्षण विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन
byMahendra Rajput
-
0
