शिरपूर - आताच हाती आलेल्या बातमी नुसार शिरपूर येथील आणखी सात जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे धुळे जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या १३१ वर पोहचली आहे. आज कोरोना रुग्ण च्या संपर्कातील शिरपूर येथील सात रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. अंबीका नगर येथील सहा तर पारधीपुरा भागातील एका रूग्णाचा यात समावेश आहे. दिवसभरात ११ रूग्णांचे अहवाल पॉजीटीव्ह आले आहेत. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत. तर धुळे शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. सुभाष नगर, गुरूदत्त कॉलनी जुने धुळे येथील ५९ वर्षीय पुरूष व देवपुरातील ग.द.माळी सोसायटी मधील ४२ वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉजीटीव्ह आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे.
शिरपूर शहरासाठी धोक्याची घंटा, 7 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह, सतर्कतेचा आवाहन
byMahendra Rajput
-
0
