पत्नीशी अनैतिक संबंधाच्या राग मनात ठेवून मुलानेच केला बापाचा खून

  
 शिरपूर प्रतिनिधी  शिरपूर तालुक्यातील कुंबी पाडा फत्तेपूर येथे आपल्या पत्नीशी आपल्याच बापाचे अनैतिक संबंध आहेत या संशयातून मुलानेच बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे .
 याबाबत सविस्तर वृत्त असे की 22 मे रोजी तक्रारदार रमाबाई अत्तर सिंग पावरा यांनी तालुका पोलीस स्टेशन सांगवी येथे येऊन फिर्याद दिली आहे  त्यांनी असे म्हटले आहे की मी माझे पती अत्तरसिंग सिंग गीलदार पावरा मुलगा बिनाज्या पावरा व सून कावीबाई ,नातवंडा सह राहत असून मोठा मुलगा बाहेरगावी विभक्त राहत असतो मात्र माझ्या मुलगा बिनाज्या  पावरा यास त्याची पत्नी कावीबाई तिच्यासोबत माझ्या पतीचे अनैतिक संबंध आहे असा संशय घेत होता.
दि. 21 मे रोजी रात्री नऊ वाजता मुलगा बिनाज्या याने  कोंबडी ची भाजी बनवण्यासाठी सांगितले व मी तेल घेण्यासाठी गावात गेली यावेळी मुलगा सून आणि नातवंडे घरीच होते .मला माझे पती रस्त्याने भेटले असता त्यांना मी भाजीसाठी तेल घ्यायला जात आहे असे सांगितले त्यानंतर ते घरी निघून आले. तेल घेतल्यानंतर मला राजाराम सुरमल पावरा याने त्यांच्या मोटरसायकलने घरी सोडण्यासाठी आले. आम्ही घरी पोहोचलो असता आमच्या घरासमोर माझे पती  अत्तरसिंग पावरा हे मृत पडलेले दिसले त्यांच्या गळ्याला दुखापत होऊन रक्तबंबाळ झाले होते व मुलगा बिनाज्या  त्याच्या हातात कुर्‍हाड होती त्यास रक्त लागलेले होते तेव्हा मुलगा  यास विचारले असता तू तुझ्या वडिलांना का मारले त्याने सांगितले की त्याचे कावीबाई बरोबर अनैतिक संबंध आहे म्हणून मी त्यास मारून टाकले कावीबाई हीच देखील कुर्‍हाडीने मारून टाकेल त्यानंतर राजाराम भोकऱ्या पावरा, रुपला पावरा, भाया पावरा ,त्यांनी मुलाच्या हातातून रक्ताने माखलेली कुर्हाड हिसकावून घेतली तेव्हा मला सून कावी बाईकडून समजले की यास मुलगा बीनाज्या यास  त्यास मारू नको असे सांगितले असता त्यावर त्याने तुला पण मारून टाकेल अशी धमकी दिली त्यामुळे तिथून पळून  जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तिला पकडून आणले होते.
 त्यामुळे मी गावाचे पोलीस पाटील उमाजी, सून या सह पोलीस स्टेशनला तक्रार देत  आहे की माझा मुलगा बिनज्या पावरा याने माझे पती अत्तरसिंग पावर वय 55  याना अनैतिक संबंधाच्या रागातून कुऱ्हाडीने घाव घालून मारले आहे विरुद्ध माझी तक्रार आहे अशी फिर्याद दिली आहे यानुसार सांगवी पोलीस स्टेशन मध्ये आरोपीच्या विरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक 42/ 2020 अन्वये भादवि कलम 302 आणि 506 नुसार गुन्हा दाखल झाला आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने