मोटार सायकल-ट्रक अपघातात न्याहळोदचे दोघे ठार



दोंडाईचा- श.  प्र. शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर धुळे रस्त्यावर मोटार सायकल आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन 2 जण ठार झालेत,  अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला. ही घटना 8.30 वाजेच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये शंकर भगवान कोळी (वय 19) आणि निंबा देवचंद कोळी (42) यांचा समावेश आहे. नातेवाईकांकडून जेवण आटोपून ते घराकडे न्याहळोदला जात असताना दोंडाईचा जवळ त्यांच्या मोटार सायकलची धडक झाली. त्यात ते जागीच ठार झालेत. दोंडाईचा पोलीस घटनास्थळी पोहचले तोवर ट्रक चालक फरार झाला. पोलिसांनी मृतांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिक्षक डॉ. ललितकुमार चंद्रे यांनी तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदन कक्षात टाकण्यात आले होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने