बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) काल शिरपूर तालुक्यातील आमोदे येथे एक कोरोना पाॅझिटीव्ह व्यक्ती आढळली आहे.त्यामुळे प्रशासन पुन्हा दक्ष झाले आहे.याच पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे यांनी शिरपूर,शिंगावे येथील कोविड सेंटरला भेट दिली.त्याठिकाणी उपचार व संसर्गाच्या सुरक्षेसंदर्भात साहित्याची काय कमतरता आहे तसेच क्वारंटाईन केलेल्या रुग्णांना, डाॅक्टर, परिचारिका,आरोग्यसेवकांना कोणत्या सुविधा पुरविल्या जात आहेत याची पाहणी केली.करून शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केद्रातील कर्मचाऱ्यांंना डॉ. तुषार रंधे यांनी स्वखर्चाने पी.पी.ई.किटचे वाटप विखरण प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी संबंधित कर्मचारींनी काही गोष्टींची मागणी केली.त्यावर डाॅ.तुषार रंधे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारींना संबंधित अडचण तात्काळ सोडविण्याची व कर्मचारींना जेवण,अल्पोपहार देण्याची सुचना दिली.तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्राच्या डाॅक्टर्स,परिचारिकांना डाॅ.तुषार रंधे यांनी स्वखर्चाने पी.पी.ई कीट दिले.
तालुक्यातील विखरण, वाडी,बोराडी, वकवाड,सांगवी,येथील आरोग्य केंद्राना भेट देऊन संबंधित केंद्राची स्वच्छता, सध्याचा उपलब्ध औषधसाठा,जंतूनाशक फवारणीचे साहित्य,तसेच आशा वर्कर्सना स्वतःची काळजी घेण्यासाठी मास्क,सॅनिटायझर,इ.साहित्याबाबत चौकशी करुन अपुर्ण साहित्य ताबडतोब उपलब्ध करून देण्याची सुचना दिली.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.शिवचंद्र सांगळे,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.मनिष पाटील,जि.प.सदस्य योगेश बादल, शिरपूर तालुक्याचे भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे,जयवंत पाडवी,विखरणचे सरपंच प्रविण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रसन्न कुलकर्णी,कवाड सेंटरचे निवासी वैद्यकिय अधिकारी डाॅ.मनोज पाटील,डाॅ.हर्षवर्धन सोनवणे, रमण पावरा,कंवरदास पाटील,शेखर माळी इ.उपस्थित होते.
