खाऱ्यापाडा येथील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी विहीर



शिरपूर - टेंभेपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणारे खाऱ्यापाडा हे गाव येथील महिलांची पाण्याची वणवण थांबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यां जताबाई रमण पावरा यांच्या प्रयत्नांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत येथे विहिरीचे उद्घाटन करण्यात आले.तसेच कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांना या माध्यमातून रोजगार उपलब्द होईल अशी आशा जताबाई पावरा यांनी व्यक्त केली व खारेपाडा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत नवीन पाणी पुरवठा विहीर खोदकामाचे उद्घाटन जिला परिषद सदस्य जताबाई रमन पावरा यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ता रमन पावरा,ग्रामसेवक के.के.जाधव,सरपंच गुरीबाई पावरा,मगन पावरा,
 जगदीश पावरा,दिलीप पावरा, आनंदा पावरा,व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने