साथीचा आजार - (प्रदीप मनोहर पाटील)




साथीचा आजार 
लोकं झालीत बेजार 
कसा करायचा बाजार 
प्रश्न उपस्थित हजार... 
झालीत अनेक बेकार 
होतेय त्यात उपासमार 
रडताय सारी कामगार 
शेतकऱ्यास बसला मार... 
व्यापारी मोठा हुशार 
साठा करताय फार 
दुपटीने विकताय माल 
ग्राहक होतोय बेजार... 
होतेय लूटमार फार 
डोकं होतंय गार
कसा चालेल संसार 
गरिबांचे हाल फार 
त्यांनाच जास्त मार 
होतील भूकबळी फार 
संसर्गाने लोकं बेजार 
खुलं मृत्यू द्वार 
काळजी घ्या फार... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055©️®️

पाणी.... पाणी बचत 

जल वाचवा  सारे 
नदीनाले  जोडणी तंत्र 
पिढीस शिल्लक ठेवा
ठिबक सिंचन मंत्र ... 

साठ्वण तलाव भरा
अडवा जिरवा कास धरा 
पाण्या वाचुन धरा 
तृप्त जीवास करा.... 

नदीस  बांधु   बंधारे 
सांडपाणी शेतात नेऊ  
पावसाचं जल साठवू 
शोष खड्डे  खोदत जाऊ ... 

पन्हाळाचं अंगणात जिरवा 
बांध बंधिस्त ठेवु 
शेताचे त्यातच जिरवू 
शिवार जलयुक्त उभारू  ... 

विहीर पुनर्भरण करा
शेतात करा  तळे 
मुबलक पिकास मिळे  
फ़ुलूद्या सर्वांचे मळे... 

पिकांना जपुन वापरा
वृक्ष जगवा वाढवा 
सर्वदूर  हिवराई करा 
वेवस्थित सारं साठवा... 

प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव 
मो. 9922239055©®

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने