धुळे, दि. 22 (जिमाका वृत्तसेवा) :कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व बसस्थानक, रेल्वे स्थानक, टोलनाक्यांसह सिमा तपासणी नाक्यांवर आजपासून विषाणुबाधीत संशंयीत रुग्ण तपासणीची विशेष मोहिम आरोग्य प्रशासनाने सुरु केली असल्याचे जिल्हा रुग्णालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे नोडल ऑफीसर तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल पाटील यांनी कळविले आहे.
या तपासणीसाठी विविध पथके गठीत करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने दोंडाईचा, नरडाणा, धुळे रेल्वेस्थानके, साक्री, धुळे बसस्थानक, सिमा तपासणी नाका हाडाखेड यांचा समावेश असून टोलनाक्यांचाही यात समावेश करण्यात आल्याचे डॉ.पाटील यांनी कळविले आहे.
0000