धुळे (प्रतिनिधी): पाेलिस पाटील यांना सहा ते सात महिन्यापासून मानधन मिळाले नाही. मानधन लवकर मिळावे. यासाठी मी शासनस्तरावर स्वता पत्रव्यवहारातुन पाठपुरावा करित आहे. पाेलिस पाटील हा जनता व पाेलिसातील दुवा असुन त्यांच्या समस्या साेडविणे महत्वाचे आहे. तर यापुढे ज्या पाेलिस ठाण्याकडून पाेलिस पाटील यांना मानधन राेख दिले जाते. अशा ठििकाणी पाेलिस पाटील यांंना बॅकेत मानधन मिळण्याची व्यवस्था करण्यात येईल. पाेलिस पाटील यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मेहनत घ्यावी. काही अडचण असल्यास मला संपर्क करावा अशी माहिती पाेलिस पाटील संघटनेच्या पदाधिकारीं साेबत चर्चा करतांना पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी दिली.
आज दि. १७ रोजी पाेलिस अधिक्षक कार्यालय धुळे येथे पाेलिस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष छाेटुलाल पाटील, साक्री तालुकाध्यक्ष रविंद्र बेडसे, पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, थाळनेर झाेनचे अध्यक्ष नितीन जाधव यांनी पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांची दुपारी भेट घेतली. सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य गाव कामगार पाेलिस पाटील संघटनेच्या वतीने चिन्मय पंडीत यांचा शाल, श्रीफळ देवुन सत्कार केला. यावेळी अप्पर पाेलिस अधिक्षक डाॅ. राजु भुजबळ उपस्थित हाेते.
संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने विविध समस्या मांडल्या तर श्री. पंडीत यांनी सर्व समस्या बारकाईने समजुन घेत त्या लवकरात लवकर साेडवुन देण्याची ग्वाही दिली.
कॅप्शन : महाराष्ट्र राज्य गाव कामगार पाेलिस पाटील संघटनेच्या वतीने पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत व अप्पर पाेलिस अधिक्षक डाॅ. राजु भुजबळ यांचा सत्कार करतांना जिल्हा अध्यक्ष छाेटुलाल पाटील, साक्री तालुका अध्यक्ष रविंद्र बेडसे, पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे, थाळनेर झाेनचे अध्यक्ष नितीन जाधव आदी.
Tags
news