नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर नगर परिषदेत देशातील पहिल्या स्वच्छता मंदिराचे उद्घाटन, सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा मंत्र जपण्यासाठी अभिनव उपक्रम





शिरपूर - नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर नगर परिषदेत देशातील पहिल्या स्वच्छता मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा मंत्र जपण्यासाठी हा स्तुत्य व अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शिरपूर शहरात सातत्याने अनेक कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. आज मंगळवारी दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते स्वच्छता मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, मुख्याधिकारी अमोल बागुल, नगरसेविका हेमलता गवळी, नगरसेविका नाजेराबी शेख, नगरसेवक
देवेंद्र राजपूत, नगरसेवक सलीम खाटीक, नगरसेवक संजय कोळी, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, संचालक अविनाश पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, नगर अभियंता माधवराव पाटील, अमरिशभाई पटेल सीबीएसई स्कूलचे प्राचार्य निश्चल नायर, भाईदास भोई, जयवंत माळी, विविध सेवाभावी संस्था पदाधिकारी, राजू ठाकूर, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, सागर कुलकर्णी, प्रमोद अहिरे, दिपाली साळुंके, जगदीश, संगिता थोरात, पौर्णिमा पाठक, श्रीजी इव्हेंट मॅनेजमेंटचे पदाधिकारी, प्रमोद अहिरे, सुषमा पवार, भावना कलंकार, नगर परिषद सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल म्हणाले, स्वच्छता हे आपले कर्तव्य आहे. देशात आपण ३४ व्या क्रमांकावर स्वच्छता बाबतीत असणे ही शिरपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. राज्यात देखील सातत्याने पुरस्कार पटकावणारी शिरपूर नगर परिषद ठरली आहे.
स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मध्ये शहरातील सर्वच क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. अभियान मध्ये
व्यापारी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी, शाळा, बाजार समिती, स्मार्ट गृहिणी या अनेक घटकांनी उल्लेखनीय सहभाग घेतला. माणूस हा कचरा निर्माण करणारा प्राणी असून त्यानेच कचरा निर्मूलन करावे. स्वच्छताबाबत सर्वांनी योगदान द्यावे, शिरपूर शहर आरोग्यदायी असेल तर स्वतः आपण आरोग्यमयी राहणार. कचरा रस्त्यावर व इतरत्र टाकू नका. जागरूक नागरिक म्हणून आपण काम करावे. दिवाळी ला आपण केरसुणी ची पूजा करतो, तसेच स्वच्छतेची दररोज पूजा व्हावी. स्वच्छता आवश्यक असल्याने त्याचे प्रतिक म्हणून स्वच्छता मंदिर निर्मिती ही नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली.भारतातील स्वच्छ शहर म्हणून सन्मान प्राप्त करू या असे मनोगत मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी केले.
स्वच्छता बाबत विविध पुरस्कारांचे वितरण यावेळी करण्यात आले. बाजार समिती, ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल, सपना हॉटेल, सतगुरु हॉस्पिटल, उत्कृष्ट कार्यालय शिरपूर वरवाडे नगर यांना गौरविण्यात आले. तसेच नगर परिषदेने घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा देखील स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक दिपाली साळुंखे यांनी केले. सूत्र संचलन प्रमोद अहिरे यांनी केले. आभार संजय हासवानी यांनी मानले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने