रावल महाविद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ सोहळा



दोंडाईचा -स्वो,वि,संस्थेचे दादासाहेब रावल विज्ञान,कला महाविद्यालयात विर शिरोमणी क्षत्रिय महाराणा प्रतापसिंहजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंनाक 18/1/2020रोजी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला यात प्रथम पारितोषिक चेतन आनंद पाटील, द्वितीय पारितोषिक तेजस निंबा गिरासे व तृतीय पारितोषिक विरुपाल रविद्र गिरासे, व प्रोस्ताहनापर पारितोषिक दुर्गेश मोहनसिंह गिरासे आणी पुजा युवराज गिरासे यांना भेटले प्रस्तुत कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाचे प्राचार्य प्राँ डाँ के, डी, गिरासे सर होते, प्रमुख अतिथी सामाजिक चळवळीत सक्रिय असणारे रामी चे उपसरपंच महाविद्यालयाचे  माजी विद्यार्थी भाऊसो.कुलदिपसिंहजी गिरासे होते तर प्रमुख वक्ते अमरजितसिंह गिरासे होते समारंमाचे प्रमुख वक्ते यांनी राणाजींचे राष्ट्रभक्तिपर विचार युवकांना प्रतिपादित केले व घुसखोंराबद्दल राणाजींचे मत काय होते यां विषयाचे दिखील प्रतिपादन केले, समारंभाचे अध्यक्ष प्राँ डाँ के, डी गिरासे यांनी युवकांना महाराणा प्रतापसिंह यांचे विचार कसे जिवन तरायला मदत करतील याबद्दल मार्गदर्शन करुन व्यसनमुक्तीचा संदेश दिला तर प्रमुख अतिथी कुलदिपसिंग गिरासे यांनी अश्या समारंभाच्या माध्यमातुन थोर पुरुषांचे विचार हे  सामान्य जनमाणसांपर्यत जातात आणी एकीकडे विचार शून्य झालेली तरुण पिढी कशी विचारसंप्पन होऊ शकते या विषयावर चिंतन केले महाविद्यालयाचे प्रभारी उपप्राचार्य   के, के कापडणे सर व डाँ पि, एस गिरासे यांच्यासह महाविद्यालयांच्या सर्वच शिक्षक वृद आणी कर्मचारी वर्गाने आयोजकांचे कौतूक केले व विजयी विद्यार्थीना मनापासुन शुभेच्छा दिल्या...  अश्या नयनरम्य पारितोषिक वितरण समारंभाचे सुत्रसंचालन चेतनसिंह राजपुत यांने आपल्या काव्य स्वरुपात व विररसाने भरपुर अश्या शायराना पद्धतीने केले तर आभार प्रदर्शन हिमानी गिरासे हिने केला प्रस्तुत सामाजिक ऊपक्रमाचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे 🙏🙏😌🙏

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने