स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श विद्यालयात स्पर्धा परीक्षेचे आयोजन




 
कल्पेश राजपूत, शहादा
 शहादा- भारताच्या इतिहासात अनेक विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले, यातील एक महत्वाचे नाव म्हणजे स्वामी विवेकानंद होय.  स्वामी विवेकानंद जयंती (राष्ट्रीय युवक) निमित्त दर वर्षा प्रमाणे स्व. निलेश राजपूत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था  मंदाणा संचालित, सरस्वती प्री- प्रायमरी स्कूल व सरस्वती कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आदर्श विद्यालय मंदाणा येथे राबविण्यात आली. त्यात इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या  एकूण ११८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या परीक्षेत इंग्रजी, मराठी, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य विज्ञान आणि महाराष्ट्रावर आधारित बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षा हि एकूण १०० गुणांची होती. या परीक्षेसाठी २ तासाची वेळ देण्यात आली होती त्यात आदर्श विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आदर्श विद्यालयातील शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या परिक्षेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. के. एस. राजपूत, सोबत उपाध्यक्ष बी. के. मोरे, सचिव पी. आय. माळी, रवींद्र कोळी, दीपाली मोरे, ख़ुशी मोरे, अनिता मोरे या शिक्षकांनी पर्यवेक्षक म्हणून परीक्षेसाठी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने