खेळामुळे जीवनाला शिस्त लागते आशाताई रंधे



बोराडी - हार-जीत होत असते पण,यात  आलेल्या परीस्थितीवर सामना करण्याची शक्ती मिळते व भविष्यात हीच शक्ती उपयोगी ठरते.तसेच खेळामुळेच जीवनाला शिस्त लागते.यामुळे व्यक्तीमत्वाचा विकास होतो.असे प्रतिपादन किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे 
यांनी केले.

किसान विद्या प्रसारक संस्थेच्या बोराडी येथील महाराणी अहिल्याबाई होळकर डी.फार्मसी महाविद्यालयामार्फत अंतर्गत इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्यस्तरीय  2020 ऍथलेटिक्‍स स्पर्धांचे उद्घाटन  शिरपूर येथील दादासाहेब विश्वासराव रंधे क्रीडा मैदानावर संपन्न झाले.यावेळी डाॅ.पी.एच.पाटील,प्राचार्य महेश पवार,प्रा.कल्पेश वाघ,इ.उपस्थित होते. राज्यस्तरीय मैदानी स्पर्धांसाठी राज्यभरातुन खेळाडू आले होते.

100 मी धावणे- प्रथम - देवेन गुजांवळे(नागोठणे),द्वितीय- हर्ष बंटे(मुंबई)

200 मी.धावणे -प्रथम- चिन्मय पाटील (वाशी),द्वितीय -अभिषेक पाटील(गारगोटी)

800 मी.धावणे- प्रथम-योगेश गोपाळ (बोराडी),द्वितीय- सुमेध रसाळ(पुणे)

1500 मी.धावणे- प्रथम-शिवानंद जायभाय(नांदेड),द्वितीय- पांगरे सुनील (रायगड)

रिले -प्रथम-फार्मसी काॅलेज (नागोठणे),द्वितीय-जयहिंद इंजिनियरींग कॉलेज (कुरण)

लांब उडी - प्रथम-अनिकेत बरीक(मुंबई),द्वितीय- वैभव राखाडे(ब्राह्मणपुरी)

उंच उडी - प्रथम- सत्यजित सोनुरे(सानसोला),द्वितीय- संकेत ठाकुर(रासनी)

तिहेरी उडी -प्रथम- अभिषेक पाटील (गारगोटी),द्वितीय-अमित देवर्डे(इस्लामपूर)

थाळीफेक- प्रथम- राजकुमार साहु(मुंबई),द्वितीय - शुभम साबळे(संगमनेर)

गोळाफेक- प्रथम- पृथ्वीराज पवार 
 द्वितीय- वरूण ठाकुर (मुंबई)

भालाफेक- प्रथम-अर्जुन सिंग (साकोली),द्वितीय - पृथ्वीराज पवार

पंच म्हणून राधेश्याम पाटील,एल के प्रताळे, जिग्नेश पराडके,आर बी सिसोदिया, हेमंत शिरसाठ,सुदर्शन गोसावी,दर्पण शहा,प्रमोद पाटील  यांनी काम पाहीले. 
फार्मसी महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारींनी परीश्रम घेतले.सुत्रसंचालन नेहा गणेश भामरे व श्रद्धा बडगुजर यांनी केले तर प्रा.सतिष पाटील यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने