धुळे - येथील श्री विले पार्ले केळवाणी मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागातील तिसऱ्या वर्षातील राहुल शर्मा या विद्यार्थ्याची निवड राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश साळुंके यांनी दिली.
आविष्कार संशोधन स्पर्धा ही राज्यपाल एस. एम. कृष्णा यांच्या पुढाकाराने २००६ पासून दरवर्षी घेण्यात येते. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवितात. या स्पर्ध्येमध्ये विद्यार्थी विविध विषयावर प्रकल्प व त्यांच्या पोस्टर चे सादरीकरण करतात.
ही स्पर्धा मुख्यतः चार टप्प्यात घेण्यात येते. पहिला टप्पा हा महाविद्यालय स्तर असून, दुसरा टप्पा विभागीय स्तर (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार २६ महाविद्यालये), तिसरा टप्पा विद्यापीठ स्तर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (डी. बाटु) संलग्न १७० महाविद्यालये) व अंतिम टप्पा राज्य स्तर (महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठे व संलग्न महाविद्यालये) यांचा असतो.
या स्पर्धेच्या पहिल्या स्तरावर एस. व्ही. के. एम. महाविद्यालयातील ३१ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामधून सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली होती. दुसऱ्या टप्प्यातून यांत्रिकी अभियांत्रिकीच्या राहुल शर्मा आणि स्थापत्य आभियांत्रीकीच्या जयकुमार पाटील ह्या विद्यार्थ्यांची निवड विद्यापीठ स्तरासाठी झाली होती.
स्पर्धेचा तिसरा टप्पा डी. बाटु, लोणेरे, जि. रायगड येथे घेण्यात आला. येथे महाराष्ट्रातील डी. बाटु संलग्न १७० महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत कठीण असा हा टप्पा मानला जातो. यामध्ये राहुल शर्मा या विद्यार्थ्याची शेवटचा टप्यात राज्य स्तरावर निवड झाली असून ती स्पर्धा मुंबई विद्यापीठ येथे दि. २८ ते ३० जानेवारी रोजी होणार आहे. या विद्यार्थ्याने ‘नॉवेल व्हेईकल’ वर पोस्टर प्रदर्शन केले होते व त्यासाठी प्रा. योगेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. ही निवड करताना डी. बाटु विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. आर. शास्त्री यांनी राहुल शर्माचा रु. ३००० रोख व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेसाठी महाविद्यालीन अविष्कार संशोधन समन्वयक म्हणून प्रा. दत्तात्रय डोईफोडे यांनी काम पहिले. विद्यार्थ्यांना प्रा. मोहम्मद जुनेदुद्यीन, प्रा. दत्तात्रय डोईफोडे, प्रा. धिरज भांडारकर, प्रा. योगेश सोनवणे, प्रा. सतीश पाटील, प्रा. भूषण बेहेडे, प्रा. महेश दलवानी, प्रा. प्रकाश काटदरे, वर्कशॉप कर्मचारी नरेंद्र पाटील, महेंद्र लोहार, योगेश चौधरी, महेश गायकवाड, रवींद्र बडगुजर, महेंद्र पाटील, गणेश पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल विद्यार्थी व प्राध्यापकांचे एस. व्ही. के. एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे ट्रस्टी चिंतनभाई पटेल, ट्रस्टी तपनभाई पटेल, व्यवस्थापन समितीचे सदस्य राजगोपाल भंडारी, धुळे कॅम्पस सल्लागार डॉ. अजय पसारी, धुळे कॅम्पस चे डायरेक्टर डॉ. के. बी. पाटील, प्राचार्य डॉ. निलेश साळुंके, प्रा. अनमोल सूर्यवंशी, विभागप्रमुख प्रा. मोहम्मद जुनेदुद्यीन, डॉ. भूषण चौधरी, डॉ. विशाल मोयल, डॉ. श्रीकांत रांधवने, डॉ. तुषार शिंदे, प्रा. खालिद अल्फात्मी यांनी अभिनंदन केले.
Tags
news
