आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व एस.व्ही.के.एम. संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 25 जानेवारी रोजी वीर हुतात्मा यांना अभिवादन, भव्य शोभायात्रा



शिरपूर- आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शाखांच्या वतीने दरवर्षाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजता शहरातील पाताळेश्वर चौक येथील शहीद स्मारक येथे वीर हुतात्मा यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार असून त्यानंतर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येईल.
शहरातून विद्यार्थ्यांची भव्य शोभायात्रा, त्यात विविध शाळांचे बॅण्डपथक, घोडेस्वार, झाक्या, लेझिम नृत्य, स्काऊट-गाईड पथक, विद्यार्थ्यांचे संचलन, अनेक वेशभूषेतील विद्यार्थी, बालकलाकार, महाराष्ट्र व भारत देशाच्या संस्कृतीचे तसेच देशभक्तीचे सर्वांना दर्शन घडवून शहरातून सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.
शहरवासीयांना वीर जवांनांचे स्मरण व्हावे, देशभक्तीपर विविध देखाव्यांमधून प्रेरणा मिळावी या उद्देशाने दरवर्षाप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आर.सी.पटेल शैक्षणिक संकुल व श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित विविध शाखांच्या वतीने दि. 25 जानेवारी रोजी कार्यक्रम आयोजित केले आहे.
कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने