दि १७जानेवारी
प्रतिनिधी :औसा :लक्ष्मण कांबळे
१३जानेवारी रोजी काश्मीरमधील सियाचीन ग्लेसर येथे ड्युटी बजावत असताना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला गावचे शहीद जवान सुरेश गोरख चित्ते यांच्या जन्मगावी सरकारी इतमामात आलमला येथिल रामनाथ विद्यालयासमोरच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील व तालुकातील खासदार आमदार जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्यकार्यकारी अधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व लातूरचे पालकमंत्री यांनी पाठवलेल्या शोक संदेशाचे ही वाचन करण्यात आले तसेच.
तालुक्यातील व जिल्ह्यातील जनसमुदाय मोठया संख्येनं शहीद जवान चित्ते यांच्या कुटुंबीय सोबत मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते
सैन्य दल व पोलिस दला मार्फत सुरेश चित्ते याना बंदुकीतून हवेत फैरी झाडून सरकारी इतमामात मानवंदना देण्यात आली चित्ते यांच्या पार्थिवास चिरंजीव आदर्श व लहान बंधू धीरज यांनी अग्नि दिल्यानंतर मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनसमुदयाने "विर जवान अमर रहे "
अशी घोषणा देत हळहळ व्यक्त केली जात होतं व सर्वांच्या डोळ्यातुन अश्रूवाहात होते शहीद जवान यांच्या पश्वाचत आई पत्नी व दोन मुली अनुजा तनुजा व आदर्श व एक लहान भाऊ धीरज असा परिवार आहे
Tags
news
