वरवाडे आर.सी .पटेल प्राथमिक शाळेत आनंद मेळावा



शिरपूर - शहरातील वरवाडे येथील आर.सी.पटेल प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी शि.व.न.प.शिक्षण मंडळ सभापती चंद्रकला माळी, उदघाटक माजी नगरसेवक काशिनाथ माळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ.भा. माळी महासंघाचे अध्यक्ष संतोष महारु माळी, मुख्याध्यापक गणेश साळुंखे, मनोज पाटील, सी.डी.पाटील, आर.बी.खोंडे, प्रदिप गहिवरे, रितेश कुलकर्णी उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविकेतून मुख्याध्यापक गोपाल पाटील यांनी केले. सुमारे 70 विद्यार्थ्यानी भाग घेतला. विविध मेनू तयार करून आपली पाककला सिद्ध केली. सुत्रसंचालन स्नेहल शिंदे यांनी केले.कार्यक्रम प्रसंगी मनिषा पाटील, वैशाली सोनवणे, देवरे कामिनी, योगिता पाटील, जाधव सर, चंदन माथने, दिनेश पावरा, प्रविण जगदेव, दिपक गिरासे आदींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार पावरा सर यांनी मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने