वीर जवान तुझे सलाम , सुरेश गोरख चित्ते यास भावपूर्ण श्रद्धांजली


प्रतिनिधी :  औसा 
 लक्ष्मण कांबळे
लातूर जिल्ह्यातील जवान शहीद...
::::::::::::::;;;;;;:::::::::::::::::::::::::
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आलमला येथील सैन्यामध्ये जवान असलेले सुरेश गोरख चित्ते यांचे सियाचीन (जम्मू कश्मीर) ड्युटीवर असताना निधन झाले . शहीद सुरेश गोरख चित्ते यांना ऑक्सिजन पुरवठा  न झाल्या मुळे सैन्यामध्ये कर्तव्य बजावत असताना वीर मरण आले असल्याबाबतची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. 13 जानेवारी  2020 रोजी सियाचीन( जम्मू कश्मीर) येथे त्यांचे निधन झाले असले तरी अद्याप त्यांचे पार्थिव त्यांच्या गावी आलेले नाही. ऑफिसियल व्हेरिफिकेशन न झाल्यामुळे प्रशासनाकडून दुजोरा मिळालेला नसला तरी मित्रपरिवार व नातेवाइकाकडून ही बातमी हाती आलेली आहे. गावकर्यांना फक्त त्यांची निधन वार्ता आलेली आहे. प्रत्येकाला अभिमान वाटावा असा सुरेश यांचा स्वभाव होता. त्यांचे शिक्षण पहिली ते चौथीपर्यंत जिल्हा परिषद  शाळेमध्ये झालेले आहे तसेच पुढील शिक्षण रामनाथ विद्यालय आलमला तालुका औसा येथे झाले. लहानपणापासून सुरेश यांना खेळाची आवड असल्यामुळे त्यांना खेळामध्ये अनेक पारितोषिकं मिळालेली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुली अनुजा  तनुजा  जुळया मुली व एक मुलगा आदर्श व वृद्ध माता तसेच एक छोटा भाऊ सुद्धा आहे. या वीर पुत्राच्या आठवणीने सबंध पंचक्रोशीत  दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. सुरेश गोरख चित्ते या वीरपुत्रास तपसे चिंचोली च्या लक्ष्मण कांबळे व प्रशांत नेटके  यांचे कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने