कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम. फार्मसी निकालात आर. सी. पटेल एम. फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश




शिरपूर - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम. फार्मसी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला असून शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी च्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळवले आहे. फार्मसी च्या सर्व शाखा मध्ये आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात घवघवीत यश संपादन प्राप्त केले.प्रथम वर्ष एम. फार्मसी फार्मासुटीक्स शाखेतून हर्षदा खंडेलवाल 8.92 सीजीपीए गुण मिळवून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात प्रथम, निलेश बोरनारे व तुषार खंडारे 8.69 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.  प्रथम वर्ष एम. फार्मसी फार्माकॉलॉजी शाखेतून श्रद्धा अमृतकर 8.85 सीजीपीए गुण मिळवून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात प्रथम तर रुपाली वसईकर, महेश कोळेकर, सुहास पाटील, प्राजक्ता भांडारकर हे चारही विद्यार्थी 8.54 गुण प्राप्त करून या सर्वानी विद्यपीठातून आणि महाविद्यलयात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर दीपाली माळी 8.38 गुण मिळवून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात तृतीय क्रमांक वर आहे.
प्रथम वर्ष एम. फार्मसी, फार्मसी प्रॅक्टिस शाखेतून धनश्री मनोहर, हर्षल वाघ, हर्षिता पाटील, कविता सोनवणे, जागृती मराठे, मनोज चव्हाण, प्रियंका धनगर, हे सात विद्यार्थी 9.00 सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात प्रथम क्रमांकावर आहेत.प्रथम वर्ष एम. फार्मसी, क्वालिटी अशुरन्स शाखेतून शीतल शिंदे आणि स्नेहा चौधरी  8.92 सीजीपीए गुण मिळवून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात प्रथम तर स्वप्निल काकुलदे, अनुजा मगर, हर्षदा बोरसे, वैभवी साळुंखे हे चार विद्यार्थी 8.77 सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात द्वितीय क्रमांक मिळवला तसेच पूजा जैन सुनील 8.62 सीजीपीए गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक विद्यपीठातून आणि महाविद्यलयात प्राप्त केला. 
                          प्रथम  एम. फार्मसी फार्माकोग्नोसी शाखेतून कोमल धोका 9.23 गुण आणि कोमल हेडा 8.92 गुण प्राप्त करून महाविद्यलयात आणि विद्यपीठातून अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे .प्रथम  वर्ष एम. फार्मसी, फार्मास्युटिकल केमेस्ट्री अमोल गवारे 9.08 सीजीपीए गुण प्राप्त करून प्रथम तर  ऐश्वर्या चाचरे, रुपाली पाटील, समाधान शिंदे, यशोदीप शिंदे हे चारही विद्यार्थी 8.92 गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात द्वितीय क्रमांकावर आहेत.प्रथम वर्ष एम. फार्मसी फार्मास्युटिकल टेकनॉलॉजी शाखेतून मोहिनी लिंडायत 9.23 सीजीपीए, काजल शर्मा 8.69 गुण अनुक्रमे प्रथम व द्वितीय तसेच भूषण शर्मा, स्नेहल ठाकरे हे दोघेही विदयार्थी 8.38 गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात तृतीय क्रमांक मिळवला आहे.व्दितीय वर्ष एम. फार्मसी फार्मासुटीक्स शाखेतून शुभम राठी 9.07, सचिन चंदनकर 9.01, असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, शितल कुवर 8.58 सीजीपीए तृतीय तर विद्यापीठात चतुर्थ, विक्रम जाधव 8.56 विद्यापीठात पाचवा तर महाविद्यलयात चवथा क्रमांकावर आहेत.व्दितीय वर्ष एम. फार्मसी  फार्माकॉलॉजी शाखेतून शिवानी वाघ 9.15 सीजीपीए, गौतम खूने 8.82. अविनाश वाडकर 8.70 असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकावर आहेतव्दितीय वर्ष एम. फार्मसी, फार्मसी प्रॅक्टिस शाखेतून हॅपी लुल्ला 8.99, सिद्धार्थ सावदेकर 8.78 असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकावर आहेत.व्दितीय वर्ष एम. फार्मसी फार्माकोग्नोसी शाखेतून स्वाती चव्हाण 9.18, पूजा मुरकुटे 9.15, प्रतीक्षा मराठे 8.68 असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहेत.व्दितीय वर्ष  एम. फार्मसी, फार्मास्युटिकल केमेस्ट्री शाखेतून मंगेश पाटील 9.23, सागर कासार व आशिष धोटे या दोघांना 9.07, अमोल पाटील 8.75 यांना असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि  तृतीय क्रमांकावर आहेत.
व्दितीय वर्ष एम. फार्मसी, क्वालिटी अशुरन्स नुपूर बाहेती 9.40, कोमल भोई 9.34, अर्जुन चव्हाण आदित्य जोशी व अमोल सूर्यवंशी 9.18 या तिघांना, सचिन चौधरी 8.08, जागृती पाटील 8.78 यांना असे सी जी पी ए गुण प्राप्त करून विद्यपीठातून आणि महाविद्यलयात अनुक्रमे प्रथम ते पाचव्या क्रमांकावर आहेत. 
                         सर्व टॉपर व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, डॉ. सी. आर. पाटील,  डॉ. सौ. एस. डी. पाटील, डॉ. एच. एस. महाजन, डॉ. एस. एस. चालीकवार, डॉ. एम. जी. कळसकर, रजिस्ट्रार जितेश जाधव व इतर सर्व प्राध्यापक आणि प्राद्यापकेतर कर्मचार्याना दिले. 
                      संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने