*श्री हनुमान व्यायाम मंदिर ट्रस्ट कडून स्वर्गीय तात्यासाहेब प्रल्हादराव माधवराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण*
श्री हनुमान मंदिर ट्रस्टचे संस्थापक विश्वस्त, शिरपूर तालुक्याचे माजी आमदार व नगराध्यक्ष, शेतकरी ,शेतमजूर व , आदिवासी बांधव यांचे साठी संघर्ष करून त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यात ज्यांचा मोलाचा वाटा होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचे मार्गदर्शक स्व. तात्यासाहेब प्रल्हादराव पाटील यांचे स्मृती दिना निमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री दिलीप जयराम लोहार विश्वस्त श्रीमती शोभाताई पुरुषोत्तम सोनवणे, श्री प्रभाकर रामेश्वर शिंपी, श्री राजेंद्र किसन सिंह राजपूत, श्री राधेश्याम बनवारीलाल गुप्ता , सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम तात्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तसेच श्रीमती शोभाताई सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
