जनसंघाचे माजी आमदार कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांचा ३० वा स्मृतिदिनानिमित्त भाजपा तर्फे आदरांजली वाहुन अभिवादन*

 


*जनसंघाचे माजी आमदार कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांचा ३० वा स्मृतिदिनानिमित्त भाजपा तर्फे आदरांजली वाहुन अभिवादन*


शिरपूर : तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी कामगार, सर्वसामान्यांचे लोकनेते, जनसंघाचे माजी आमदार, माजी नगराध्यक्ष तात्यासाहेब कै. प्रल्हादराव माधवराव पाटील यांच्या (दि.४ फेब्रुवारी) रोजी ३० वा स्मृतिदिना निमित्त येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात प्रतिमा पूजन करुन अभिवादन करण्यात आले. धुऴे भाजपा मा. जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांचा प्रतिमेस मार्ल्यापण करुन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांनी कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. याप्रसंगी धुऴे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, वाघाडी सरपंच किशोर माऴी, एन. डी. पाटील, संजय आसापूरे, आबा धाकड, रविंद्र भोई, मुबीन शेख, महेंद्र पाटील, अनारसिंग पावरा, योगीराज शिंपी, रमेश चौधरी, नरेश पवार, लोटन पाटील, जितेंद्र पाटील, राधेश्याम भोई, शरीफ तेली, पावभा कोऴी, जितेंद्र राजपुत, संजय पाटील, जयंवत पाटील, मुकेश पाटील, रफीक तेली आदि उपस्थित होते. कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक जीवनात शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिले आहे. त्यांनी जनसंघापासून आपली राजकिय सुरुवात केली होती. त्यांनी शहरात व तालुक्यात शेतकरी, कष्टकरी, कामगार, व दुर्बल घटकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडली. आमदार तसेच नगराध्यक्ष म्हणून त्यांनी शिरपूर शहर व तालुक्यातील जनतेची सेवा केली असल्याचे बबनराव चौधरी यांनी सांगितले. यावेळी प्रल्हादराव तात्या पाटील यांचा आठवणींना एन. डी. पाटील, किशोर माऴी यांनी उजाळा दिला. शिरपूर शहरातील भाजपा कार्यालयात कै. प्रल्हादराव तात्या पाटील यांचा स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास शिरपूर शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, भाजपाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने