*शिरपुर शहरात केसरी कुस्तीचा आखाडा रंगला*
शिरपूर शहरात गरबा ग्राउंड या ठिकाणी शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 संध्याकाळी ठीक चार वाजता शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उद्घाटन माजी उपगराध्यक्ष माननीय आबासाहेब काशिनाथ माळी यांच्या हस्ते करण्यात आले .आखाडा पूजन माननीय नगरसेवक चंदू नाना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सदर स्पर्धेकरिता शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा माननीय संगीताताई देवरे .भाजप जिल्हाध्यक्ष बबन भाऊ चौधरी . धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष दिलीप आप्पा लोहार,भाऊसो दीपक महादू माळी नगरसेवक तथा अध्यक्ष शिरपूर तालुका तालीम संघ,पिंटू भाऊ माळी अध्यक्ष समता परिषद शिरपूर, दादासो राज सिसोदिया नगरसेवक,ताईसो सुनंदाबाई माळी माजी नगरसेविका,ताईसो अमृता महाजन नगरसेविका,डॉ. वृषाली बडगुजर नगरसेविका, डॉ .अतुल बडगुजर शिरपूर ,हेमंत माळी सर, युवराज माळी सावता परिषद जिल्हाध्यक्ष,बाबा गोसावी. सामाजिक कार्यकर्ते,दिनेश साळवे सामाजिक कार्यकर्ते,खंडू दादा महिरे. दादासो मंगेश माळी, डॉ.महेंद्र कोळी, दादासो प्रल्हाद पाटील,भाऊसो राहुल कोळी जगदीश वाणी सर आयत सर वसीम खाटीक पत्रकार शिरपूर दीपक गवळे पत्रकार शिरपूर, शिवा पैलवान अनवर पैलवान . हे सर्व मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धा 12 वर्षे मुले 14 वर्षे मुले सतरा वर्षे मुली ओपन गट मुल. शिरपूर केसरी 100 किलो. वजन गट त्याच्यात पैलवान प्रफुल्ल साळुंखे हा शिरपूर केसरी झाला. त्याला मानाची गदा प्रमाणपत्र व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन माननीय युवराज महाजन. दीपक भाऊ धनगर. पैलवान मनीष महिरे. पैलवान सोनू भाऊ कोळी यांनी केले होते.सदर स्पर्धेकरिता पंच म्हणून पैलवान श्री .सुभाष निकुंभेसर. कुस्ती कोच पप्पू माळी पैलवान .पै.आनिल गायकवाड गोपी लिडिया यांनी यशस्वीपणे काम पाहिले
